Cyber Fraud : शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर भामट्याचा डल्ला, पोलिसांनी चक्र फिरवली अन् आरोपीसह रक्कम परत मिळवली
Beed News : बीडच्या सायबर पोलिसांनी मलकापूर येथून एक आरोपीला अटक केली आहे.
Beed News : बीडमध्ये (Beed) दोन शेतकऱ्यांच्या खात्यावरून ऑनलाइन रक्कम हडपणाऱ्या एका आरोपीला बीड सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून 86 हजार रुपयांची रक्कम तक्रारदार शेतकऱ्यांना परत देण्यात आली आहे. रुई येथील एका शेतकऱ्याच्या खात्यावरून मलकापूर येथील एका आरोपीने 86 हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक केली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडे आल्यानंतर बीडच्या सायबर पोलिसांनी मलकापूर येथून एक आरोपीला अटक केली असून, तक्रारदार शेतकऱ्याला 86 हजार रुपये परत करण्यात आले आहेत. राजभाऊ दिनकर (रा. रूई, ता. धारूर) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी असलेले राजभाऊ दिनकर यांच्या खात्यावरून 7 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान पैसे कमी झाले. यावेळी त्यांच्या बँक खात्यातून खात्यावरून 56 हजार रुपये कमी झाले होते. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी 5 डिसेंबर 2023 रोजी तलवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पुढे हा गुन्हा तो सायबर ठाण्यात वर्ग करण्यात आला. यात पोलिसांनी योग्य तपास करत गणेश खरसाने (वय 25, रा. मलकापूर, जि. बुलढाणा) याला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे त्याने वेगवेगळ्या माध्यमातून खर्च केलेले 56 हजार रूपये वसूल करून जप्त करण्यात आले. संबंधित शेतकऱ्याला पोलिसांकडून हे पैसेही परत करण्यात आले आहे.
शेतकऱ्याला मोठा दिलासा...
सायबर भामटे वेगवेगळ्या पद्धतीने खात्यावरील पैसे वळवून घेत असल्याच्या अनेक घटना रोज घडत आहेत. विशेष म्हणजे अनेकदा सायबर फसवणुकीत पैसे रिकव्हर करणे अवघड होते. दरम्यान राजभाऊ दिनकर यांनी शेतीतून पिकवलेल्या कष्टाचे पैसे बँकेत ठेवले होते. पण त्यावर देखील भामट्याने डल्ला मारला. त्यामुळे आता आपले पैसे गेले असं त्यांना वाटले. पण सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीसह चोरीला गेलेली रक्कम देखील परत मिळवून दिली आहे.
एटीएमवरून काढून घेतेले 30 हजार...
दुसऱ्या एका घटनेत केज तालुक्यातील पिराचीवाडी येथील श्रीराम सिताराम कदम यांचे एटीएम कार्ड 17 मे रोजी हरवले होते. कदम यांचे शिक्षण कमी असल्याने त्यांनी कार्डवरच पासवर्ड लिहून ठेवला होता. हेच कार्ड नात्यातीलच एकाला सापडले. त्याने त्यातील 30 हजार रुपये काढत खर्च केले. कदम यांनी तक्रार देताच सायबर पोलिसांनी तपास करून आरोपीपर्यंत पोहोचले. यात संबंधितानेही पैसे घेतल्याची कबुली दिल्यावर ते पैसे कदम यांना परत करण्यात आले. आता हा अर्ज निकाली काढण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Cyber Fraud : सावध व्हा! पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत सायबर फ्रॉड, तब्बल 16 लाखांना गंडा!