Deepak Kedar on Santosh Deshmukh Case : सैफ अली खानला दोन दिवसात न्याय कसा मिळतो? दया नायक कमरेला बंदूक लावून त्याच्या न्यायासाठी तिथे गेला, मग आम्हाला न्याय का नाही? असा सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार (Deepak Kedar) यांनी उपस्थित केलाय. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पालकमंत्रिपदावरून डावलण्यात आले. यावरून धनंजय मुंडे यांनी मी अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की, बीडच्या पालकमंत्रिपदी अजितदादांना जबाबदारी द्यावी, असे वक्तव्य केले होते. यानंतर दीपक केदार यांनी धनंजय मुंडेंवरही जोरदार हल्लाबोल केलाय. 


संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाच्या सभेतून दीपक केदार म्हणाले की, माझ्यामुळे सगळं कंट्रोलमध्ये आहे. मला बोलू दिलं नाही तर लक्ष्मण हाके उड्या मारेल. मोर्चे निघाले नसते तर वाल्मिक कराडला मकोका लागला नसता. आज हे दोन्हीही कुटूंब उन्हात बसले आहेत. संतोष देशमुख यांना हाल-हाल करून मारले. सोमनाथ सूर्यवंशींना हाल-हाल करून मारले. या दोन्हीही प्रकरणातील आरोपींना फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 


मग राजीनामाही देऊन टाका


धनंजय मुंडे म्हणतात मीच अजित पवारांना बीडचे पालकमंत्री व्हायला सांगितलं. मग राजीनामाही देऊन टाका, असे म्हणत धनंजय मुंडेच बीडचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत हे यातून दिसत असल्याचा आरोप दीपक केदार यांनी केला. सैफ अली खानला दोन दिवसात न्याय कसा मिळतो? दया नायक कमरेला बंदूक लावून त्याच्या न्यायासाठी तिथे गेला, मग आम्हाला न्याय का नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


सामाजिक सलोखा तयार होत असल्याने हाकेंच्या पोटात दुखतंय


ते पुढे म्हणाले की, हा लक्ष्मण हाके, याला बरळेच्या दवाखान्यातील गोळ्यांची आवश्यकता आहे. हा म्हणतो मोर्चातून कोपर्डी - 2 येणार आहे. मोर्चा निघत असल्याने त्याची दुखत आहे. सामाजिक सलोखा तयार होत असल्याने त्याच्या पोटात दुखतंय, अशी टीका दीपक केदार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली. सरकार या कुटुंबांना न्याय कधी देणार? माणुसकीला न्याय देण्यासाठी या मोर्चात सगळे यायला लागलेत. गुन्हेगाराचे वंशज देखील मोर्चात येत आहे, असे म्हणत त्यांनी वाल्मिक कराडसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर टीका केली. गुन्हेगारांचे भक्त वाढलेत, आम्ही मोर्चे काढले म्हणून हे गप्प बसलेत. आरोपीला फाशी होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार, असेही दीपक केदार म्हणाले.


आणखी वाचा 


Anandraj Ambedkar : मुख्यमंत्र्यांना सत्तेचा माज, बीड आणि परभणी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : आनंदराज आंबेडकर