(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
PM Narendra Modi Solapur Visit Today : सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भव्य प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देश-विदेशातील दिग्गजांना रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. देशभरातील रामभक्तांना आता फक्त रामललाच्या भेटीची ओढ लागली आहे. देशातील प्रत्येकाच्या मनी रामललाच्या दर्शनाची आस आहे. यापूर्वी गुरुवारी, 18 जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे.
Latur News : लातूरमध्ये 2 लाख 30 हजार दिव्यातून साकारली श्रीरामचा प्रतिमा, नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी
अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात संपूर्ण देशभरात उत्साह आहे. त्याच पार्श्वभूमीवर लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून श्रीरामाची भव्य प्रतिमा साकारण्यात आलीये. तब्बल 2 लाख 30 हजार दिव्यांच्या माध्यमातून ही प्रतिमा साकारण्यात आलीये. मागील एका महिन्यापासून ही प्रतिमा साकारण्याचे काम सुरु होते. त्यासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे काम सुरु करण्यात आले. सध्या या कलाकृतीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आलीये.
Bhiwandi News : भिवंडीत 22 तारखेला मांस मच्छीची दुकानं बंद, आयुक्तांचे आदेश; पुण्यातही मटण, चिकन विक्री बंद, व्यावसायिकांचा निर्णय
Bhiwandi News : राज्यासह संपूर्ण देशभरात सध्या एकच उत्साहाचा विषय आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचलीये. त्याच पार्श्वभूमीवर भिवंडीमध्ये मांस आणि मच्छीची विक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेत. यासंदर्भातले एक परिपत्रक देखील त्यांनी जारी केले आहे. भिवंडीसह पुण्यातही 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
विकासकामांकरिता शेकडो एकर कांदळवनाची कत्तल करता आणि एका तिवरासाठी बांधकाम थांबवता? हायकोर्टाची नाराजी
विमानतळासाठी शेकडो एकर कांदळवनाची कत्तल चालते, पण एका तिवराच्या झाडासाठी इमारतीचं बांधकाम थांबवता? नवी मुंबई प्रशासन मेगा प्रकल्प पूर्ण करण्यास नेहमीच आग्रही असतं. प्रस्तावित विमानतळाच्या बांधकामात सखल भागाचा अडथळा आल्यास तिथल्या अनेक एकर तिवरांची कत्तल करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली जाते. हा जनहिताच्या प्रकल्पासाठी परवानगी द्या, अशी विनवणी केली जाते. मात्र एक तिवराचं झाड बाधित होऊ शकतं म्हणून निवासी इमारतीच्या बांधकामाला परवानगी दिली जात नाही?, ही भूमिका योग्य नाही असा संताप मुंबई उच्च न्यायालयानं नवी मुंबई महापालिकेबाबत व्यक्त केला.
Rohit Pawar : 24 ऐवजी 22 तारखेला चौकशीला बोलवा, ईडीच्या समन्सनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया
Rohit Pawar : ईडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना समन्स बजावण्यात आलं आहे. त्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आलीये. त्यांनी यावेळी ईडीला विनंती केलीये. त्यांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 24 ऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं.तशी माझी तयारी आहे.
Ajit Pawar : मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील, पण काही जण ऐकायलाच तयार नाही, अजित पवारांचा मनोज जरांगेंवर निशाणा
Ajit Pawar : मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशीलच आहे. पण काही जण ऐकायला तयार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला. तसेच पुन्हा एकदा अजित पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पटलावर आहे. त्यातच मनोज जरांगे हे 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करतील.