एक्स्प्लोर

Maharashtra News LIVE Updates 18th March : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News LIVE Updates 18th March : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

12:57 PM (IST)  •  18 Mar 2024

Solapur Lok Sabha Election : सोलापुरातून राम सातपुते की अमर साबळे? देवेंद्र फडणवीसांची चर्चा सुरू

सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते आणि अमर साबळेंच्या नावाची चर्चा आहे. याच जागेवर देवेंद्र फडणवीस हे साबळे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. आज दिल्लीत होणाऱ्या महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत  राज्यातील काही जागांवर चर्चा होणार आहे. त्या आधी देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या इच्छुक उमेदवारांशी बोलत आहेत.

12:48 PM (IST)  •  18 Mar 2024

Sangli Lok Sabha Election : शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा, ती जागा काँग्रेसची: विश्वजित कदम

शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा, ती जागा काँग्रेसची असल्याचं विश्वजित कदम म्हणाले. या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सांगलीची जागा ही शिवसेनेला मिळाली आणि त्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले होते. 

07:33 AM (IST)  •  18 Mar 2024

Maharashtra Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस

Maharashtra Unseasonal Rain : हवामान विभागाकडून विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार काल अनेक जिल्ह्यात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नागपूर शहरात विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे नागपुरकरांची चांगलीत तारांबळ उडाली. तर अमरावती, अकोल्यातही अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं प्रचंड नुकसान झालं. तर वर्ध्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय.

07:32 AM (IST)  •  18 Mar 2024

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर, मतदारसंघात पाच सभा होणार, ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे एकूण पाच सभा हिंगोली लोकसभा मतदारसंघात घेणार आहेत. आज वसमत, सेनगाव आणि कळमनुरी इथे जनसंवाद मेळावा होणार असून उद्या 19 मार्चला उमरखेड आणि अर्धापूर इथे जनसंवाद मेळावा घेणार आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे आणि त्यामुळे याच जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर करणार आहेत.
07:31 AM (IST)  •  18 Mar 2024

Rahul Gandhi vs PM Modi: ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत, राहुल गांधींचा शिवाजी पार्कवरून हल्लाबोल

Rahul Gandhi vs PM Modi: पंतप्रधान मोदी हे देश चालवणाऱ्या अज्ञात शक्तीच्या हातचं बाहुलं झालेत अशी टीका राहुल गांधींनी केली. देशाची संपत्ती मूठभर लोकांच्या हाती एकवटलीय. चीनशी टक्कर देऊ शकतील असे लघु उद्योग संपवले जात आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. इलेक्टोरल बॉण्डस् हे एक्सटॉर्शन रॅकेट आहे या आरोपाचा पुनरूच्चार राहुल गांधी यांनी केला. ईडी सीबीआय एखाद्या गुंडाच्या हाती दिल्यासारखी स्थिती आहे असं राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातल्या एका नेत्याने नुकतीच काँग्रेस सोडली. ते सोनिया गांधींसमोर अक्षरशः रडले, या शक्तीशी लढण्याची ताकद माझी नाही अशी गयावया करत होते असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget