Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर....
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Parbhani : परभणीच्या सेलु पोलीस ठाण्यात मराठ्यांचा ठिय्या, थेट पोलीस ठाण्यात आंदोलन
Parbhani : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे आणि मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेलू तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जेलभरो आंदोलन केले आहे. यावेळी मराठा समाज बांधवांनी पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन करत एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी केली. आरक्षणा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Prithviraj Chavan : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमच्या पक्षाची बँक खाते गोठवण्यात आली
Prithviraj Chavan : जुनी केस उकरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमच्या पक्षाची बँक खाते गोठवण्यात आलेले आहे
- याचा स्पष्ट अर्थ आहे की भाजपला काल सुप्रीम कोर्टाने फटकावल्यानंतर आज ही कारवाई होते
- यासंदर्भात आम्ही कायदेशीर लढाई लढू
Mahesh Gaikwad : महेश गायकवाड यांच्या आज डिस्चार्ज होणार नाही, डॉक्टरांची माहिती
Mahesh Gaikwad : महेश गायकवाड यांच्या आज डिस्चार्ज होणार नाही. शरीरावर सूज असल्यामुळे त्यांना चालताना त्रास होत आहे त्यामुळे डिस्चार्ज देण्यात येणार नाही.. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर राहुल पाटील यांना आज सायंकाळी किंवा उद्या मध्ये डिस्चार्ज देण्याची शक्यता वर्तविली जात आहे...
धुळे सोलापूर महामार्गावर मागील रस्ता रोको
Chhatrapati Sambhaji Nagar : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाच्या वतीने धुळे सोलापूर महामार्गावरील चित्ते पिंपळगाव येथे मागील चार तासापासून मराठा बांधव यांनी रास्ता रोखून धरला आहे. महामार्ग रोखून धरल्यामुळे दूर दूर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Prakash shendge : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा, प्रकाश शेंडगेंची टीका
Prakash shendge : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा समाजाची फसवणूक केली जात आहे.
राज्य मागासवर्ग आयोग हा मराठा आयोग झाला होता.
त्यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यात आले.
अवघ्या 8 ते 10 दिवसांमध्ये 1 कोटी 58 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली.