Maharashtra News LIVE Updates : भारतात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 6 पाकिस्तानींना अटक, 480 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
SBI Submitted Data to ECI : स्टेट बँक ऑफ इंडियाने माहिती निवडणूक आयोगाला सादर
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने माहिती निवडणूक आयोगाला सादर केली आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश एसबीआयला देण्यात आले होते.
In compliance of Hon’ble Supreme Court's directions to the SBI, contained in its order dated Feb 15 & March 11, 2024 (in the matter of WPC NO.880 of 2017), data on electoral bonds has been supplied by State Bank of India to Election Commission of India, today, March 12, 2024.
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) March 12, 2024
Gujrat Drugs Seized : भारतात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 6 पाकिस्तानींना अटक
Gujrat Crime News : भारतात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या सहा पाकिस्तानी इसमांना समुद्रात अटक
गुजरात ATS, भारतीय तटरक्षक दल यांची संयुक्त कारवाई
एकूण 480 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
ही कारवाई 11-12 मार्च रात्री करण्यात आली आहे
ताब्यात घेतलेल्यांना पोरबंदर ला आणले जाणार
Jalgaon Bus Accident : कन्नड घाटात बस वळणावर उतरली, अनेक जण जखमी
Jalgaon Bus Accident : छत्रपती संभाजीनगर येथून मध्यप्रदेशातील सेंधवाकडे जाणारी बस कन्नड घाट उतरत असताना वळणावर दस्तुरी फाट्याजवळ घाटाच्या खाली उतरली. यात झालेल्या अपघातात जवळपास 20 च्या वर मजूर प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. काही जखमींवर चाळीसगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले तर सहा ते सात मजुरांना जबर मार लागल्याने त्यांना धुळे येथे नेण्यात आल्याचे समजते. या अपघातप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस मजुरांना घेऊन सेंधवाकडे जात असताना आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बस घाटात वळण रस्त्यावर वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली उतरली. बसमध्ये 37 प्रवासी होते. त्यातील 20 च्या वर मजुर प्रवाशांवर चाळीसगावात उपचार करण्यात आले तर 7 प्रवाशांना जास्त मार लागल्याने त्यांना धुळे येथे नेण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतुक शाखा, महामार्ग पोलीसांसह वैद्यकीय पथकाने तात्काळ घटनास्थळ पोहचून मदत कार्य केले.रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्पिता पाटील, कैलास राठोड, आरोग्य सेवक नितीन तिरमली, अश्विनी बनसोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मदत कार्य केेले. जखमींना रूग्णवाहीकेतून ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
Bhandara News : लाखनी तहसील कार्यालयावर धडकला काँग्रेसचा मोर्चा....राज्य सरकारच्या विरोधात दिल्यात घोषणा....
Bhandara Congress Morcha : राज्यातील महायुती आणि केंद्रातील भाजपच्या सरकारनं शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. अशात महागाई वाढत चालली असून बेरोजगारांची संख्याही वाढत आहेत. कृषी पंपांना 24 तास वीजपुरवठा करण्याचे दिलेलं आश्वासनही हवेत विरलं असून आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकार जुमालेबाजी करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. लाखनी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार सहभागी झाले होते.
Latur News : न्यायालयाच्या आवारात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
Latur Crime News : निलंगा येथील न्यायालयाच्या आवारात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अविनाश बालाजी कांबळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दोन हातात दोन कोयते घेऊन निलंगा कोर्टाच्या आवारात हा तरूण दहशत निर्माण करत फिरत होता. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली, पोलिसांनी या तरुणाला आता ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.