Maharashtra News Updates : केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण, 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध; सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महानगर गॅस लिमिटेडकडून पुन्हा एकदा दरवाढीचा झटका
सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडनं ग्राहकांना पुन्हा एकदा दरवाढीचा झटका दिला आहे. महानगर गॅसकडून मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो साडेतीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती पीएनजीच्या दरात प्रति एससीएम दीड रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत ही दरवाढ आजपासून लागू होईल. मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर 89.50 रुपये प्रति किलो तर घरगुती पीएनजीचा दर हा 54 रुपये प्रति एससीएम आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी व पीएनजी दरात आतापर्यंत अनेकदा वाढ केली आहे. त्यामुळं आता महागाईची झळ सर्वसामान्य मुंबईकरांना सोसावी लागणार आहे.
मराठी पाट्या 18 डिसेंबरपर्यंत कारवाईला स्थगिती
मुंबईतील दुकानांवर मराी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दुकानदारांना दिलासा. 18 डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकानं आणि आस्थापनांवरच्या नावाच्या पाट्या ठळक मराठीत अनिवार्य करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला होता.
प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ मागे
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा. मोठ्या स्टेशनांचे वाढलेले प्लॅटफॉर्म तिकीट दर झाले कमी. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी फलाट तिकीटांचा दर वाढवला होता. असे दर वाढवण्याचा विभागीय रेल्वे मॅनेजराचा अधिकार रेल्वे बोर्डाने काढला.
पेन्शन योजनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. 2014 ची कर्मचारी पेन्शन सुधारणा योजना कायदेशीर आणि वैध. पेन्शन फंडात सामील होण्यासाठी 15 हजार रुपयांची मासिक वेतन मर्यादाही हटवली
सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात
कोकणातला रिफायनरी विरोध आणखी तीव्र करण्याचा निर्धार रिफायनरी विरोधी संघटनेने केलेला आहे. कारण आता यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील प्रकल्पविरोधात असलेली रिफायनरी विरोधी संघटना आता थेट बारसू - सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. मुंबई इथे संघटनेची बैठक झाली आणि त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नाणार आणि आसपासच्या जवळपास 14 गावांमधील लोक हे सध्या सुरू असलेल्या रेफारणारी विरोधी आंदोलनाला साथ देणार आहेत. त्यात साठी आता थेट आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. वेळेप्रसंगी मुंबईतून देखील लोक या रिफायनरी विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात.
एअर इंडियाच्या इमारत खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नवी ऑफर
एअर इंडियाच्या इमारत खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नवी ऑफर
------------
इमारत खरेदीसाठी सरकारची १ हजार ६०० कोटींची ऑफर
-----------------
मविआ सरकारनं इमारत खरेदीसाठी १ हजार ४०० कोटींची ऑफर दिली होती
माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात
माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात. नसीम खान सुखरूप असून त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
एफडीएची मोठी कारवाई! 29 कोटी रुपयांचे अन्न पदार्थत जप्त
मुंबई : एफडीएचने मोठी कारवाई करत 29 कोटी रुपयांचे अन्न पदार्थत जप्त केले आहेत. 2,62,663 किलो आणि 854.84 लिटरचा 29.67 कोटींचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. एफडीएचा अधिकाराने टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, MIDC तुर्भे, नवी मुंबई येथे 02 नोव्हेंबर रोजी धाड मारून कारवाई केली होती. जप्त करण्यात आलेले अन्नपदार्थ हे बाहेरील देशातून आयात करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण, 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध; सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला
केंद्र सरकारने दिलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी निकाल जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दीर्घ सुनावणी केल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निवृत्तीआधी महत्त्वाचा निर्णय आहे. 103 वी घटनादुरुस्ती वैध की, अवैध याचा निर्णय होणार आहे.
औरंगाबादमध्ये दान पेटीतील रक्कम चोरट्यानी पळवली
औरंगाबादमध्ये भर दुपारी मंदिरात चोरी. आधी पाया पडले ,नंतर केली चोरी. गंगापूर तालुक्यातील दिवशी पाचपीरवाडी गावच्या टेकडी महादेव मंदिरातील दान पेटीतील रक्कम चोरट्यानी पळवली..