एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 29 November 2022 : देवेंद्र फडणवीसांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा; अॅड. रवी जाधवांचा मुंबई सत्र न्यायालयात अर्ज

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 29 November 2022 : देवेंद्र फडणवीसांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा; अॅड. रवी जाधवांचा मुंबई सत्र न्यायालयात अर्ज

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

शिवप्रताप दिन उत्सवाच्या निमित्ताने 29 आणि 30 नोव्हेंबर असे दोन दिवस विविध कार्यक्रम प्रतापगडावर होणार आहेत.  आज दुपारनंतर मुख्यमंत्री मुक्कामी महाबळेश्वर मध्ये येणार आहेत.  त्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याबरोबरच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यासह दिवसभरात नियोजित असलेल्या महत्वाच्या राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्री आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडीचा आढावा घेणार आहोत.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत..  

साताऱ्यात शिवप्रताप दिन विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार 

शिवप्रताप दिन उत्सवाच्या निमित्ताने 29 आणि 30 नोव्हेंबर असे दोन दिवस विविध कार्यक्रम प्रतापगडावर होणार आहेत.  आज दुपारनंतर मुख्यमंत्री मुक्कामी महाबळेश्वर मध्ये येणार आहेत. तर 30 तारखेला ते गडावर स्वतः हजर राहून छत्रपती शिवरायांच्या नावाचा झेंडा बुरुजावर झळकवणार आहेत.   

राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी  पुण्याहून कोल्हापूरला पोहचतील.  पंढरपूरातील माऊली कॉरिडॉरला विरोध करणारे सर्व पक्षीय शिष्टमंडळ कोल्हापूर विश्रामगृह येथे राज ठाकरे यांना भेटणार आहेत. 

पुण्यातील रिक्षा संघटना राज ठाकरेंची भेट घेणार
पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनातील रिक्षा संघटनांची कृती समिती राज ठाकरेंची भेट घेणार आहे. 
 
जेजुरीच्या खंडेरायाची चंपाषष्ठी यात्रा
महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराय. खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा पार पडतात. मात्र विजयाचं महाप्रतिक असणाऱ्या चंपाषष्टी यात्रेला राज्यभर वेगेळे स्थान आहे. खंडेरायाच्या  जेजुरी गडावर सहा दिवस घट स्थापन करून साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी यात्रेची आज वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवद्य देवाला दाखवून  घट उठवून सांगता होणार आहे. मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत दाखल होत असतात. जेजुरीच्या प्रत्येक घरातील लोक हा नेवैद्य घेऊन जातात.  
 
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. देशमुखांनी सीबीआय केसमध्ये जीमानासाठी अर्ज दाखल केलाय.  
 
नांदेडमध्ये  लव्ह जिहाद विरोधात जिल्ह्यात हिंदू संघटना रस्त्यावर उतरणार

देशातील वाढत्या लव्ह जिहाद प्रकरणा संदर्भात सरकारने कडक कायदे करून कठोर भूमिका घ्यावी व नांदेड येथील स्वप्नील नागेश्वर या तरुणाचा प्रेम संबंधांतून विशिष्ट समुहातील टोळक्याने केलेल्या हत्येच्या निषेधार्थ, विश्वाहिंदू परिषद, बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 1 वाजता रॅली काढणार आहेत. 

अमरावतीत राष्ट्रीय संत संमेलन

अचलपूर येथे आजपासून 8 डिसेंबर पर्यंत एकादश कुंडात्मक श्रीराम महायज्ञ आणि श्रीराम कथा आणि राष्ट्रीय संत संमेलन होत आहे. यावेळी देशभरातून जवळपास 500 साधुसंत येणार आहेत. अचलपूर येथील बालाजीपूरम चांदूरबाजार रासेगाव रोड सुलतानपूरा येथे 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत आचार्य सुदर्शनजी महाराज वृंदावन यांचे मार्गदर्शनाखाली सकाळी 6 ते 8 एकादश कुंडात्मक श्रीराम महायज्ञ आणि दुपारी 2 ते 6 आंतरराष्ट्रीय श्रीराम कथा प्रवक्त्या श्री श्री 1008 श्रीमहंत श्रीराम मोहनदासजी रामायणी महाराज हिमाचल प्रदेश यांच्या दिव्य वाणीतून श्रीराम कथेला प्रारंभ होणार आहे. 

23:22 PM (IST)  •  29 Nov 2022

एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांना आंदोलन करता येणार नाही

एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांना आंदोलन करता येणार नाही 

९/११/२२ पासून पुढची सहा महिने एसटी महामंडळची सेवा लोकोपयोगी म्हणून घोषीत


औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ कलम २ (एन) (६) अंतर्गत लोकोपयोगी सेवा जाहीर

शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या अधिसूचने प्रमाणे कारवाई 

औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ मधील कलम २ (एन) (६) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे रा. प. महामंडळाची सेवा दि. ०९.११.२०२२ पासून पुढील ६ महिन्याच्या कालावधीकरीता "लोकोपयोगी सेवा" म्हणून घोषित केलेली आहे.

सदर अधिसूचना सोबत जोडली असून, त्याची प्रत आगार /विभाग/ बसस्थानकाच्या सूचना फलकावर लावून सर्व कर्मचा-यांच्या नजरेस आणून द्यावी.

23:17 PM (IST)  •  29 Nov 2022

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्री. माने यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.

या समितीच्या सदस्यपदी ॲड. राम आपटे, दिनेश ओऊळकर तर विशेष निमंत्रीत म्हणून ॲड. र. वि. पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे विशेष निमंत्रीत असून सीमा प्रश्न विषयी काम पाहणाऱ्या विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य सचिव आहेत. 

22:27 PM (IST)  •  29 Nov 2022

कल्याणमधील घटना गॅस लिकेज मुळे स्फोट ,दोन महिला जखमी

कल्याण पश्चिम गौरी पाडा येथील सर्वोदय इमारतीमधील एका घरात गॅस लिकेजमुळे स्फोट झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.दरम्यान या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.सुखविंदर कौर, कलवंत कौर अशी जखमी महिलांची नाव आहेत . दोघी सासू सूना आहेत .याच दरम्यान घरात बेडरूम मध्ये एक  महिला व तिचे  दीड महिन्याचा बाळ होते मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही .अग्निशमन विभाग व स्थानिक नागरिकांच्या मदतीने या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले ..मात्र या स्फोटात किचन चे नुकसान झाले आहे .घरी स्वयंपाक करताना गॅस लिकेज मुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. गॅस लिकेज मुळे हा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.

22:26 PM (IST)  •  29 Nov 2022

धाराशिव शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांचा मुंबई येथे शिंदे गटात प्रवेश

धाराशिव शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांचा मुंबई येथे शिंदे गटात प्रवेश

22:20 PM (IST)  •  29 Nov 2022

बदलापूरमध्ये नागरिकांचा पाण्यासाठी हंडा कळशी मोर्चा

सोनिवली परिसरातील गोल्डन व्हॅली भागात मागील चार वर्षांपासून पाण्याची मोठी समस्या आहे. इथल्या नागरिकांना दिवसातून फक्त १० मिनिटं पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्यातही कमी दाबाने पाणी येणं, पाण्याच्या ऐवजी नुसतीच हवा येणं अशा समस्या नागरिकांना भेडसावतात. पाणीच नसल्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजा भागवताना मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत मागील ४ वर्षात नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अनेकदा तक्रारी आणि पाठपुरावा करूनही नागरिकांची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आज अखेर गोल्डन व्हॅली भागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात गोल्डन व्हॅली परिसरातील भागातील महिला, पुरुष, वृद्ध नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिकामे हंडे आणि कळशा वाजवत या नागरिकांनी मजीप्रा कार्यालयावर मोर्चा काढला. तसंच कार्यालयाच्या आवारातच ठिया देखील दिला. अखेर नागरिकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर नागरिकांनी मोर्चा स्थगित केला.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! आनंदवन 75 वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांची माहिती
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! कॉर्पस फंडसाठी ही देवेंद्र फडणवीसांकडून भरघोस निधी  
Home Loan Interest Rates: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhattisgarh Bijapur : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा, 2 जवान शहीदPankaja Munde On Gopinath Munde : गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला, पंकजा मुंडेंचं वक्तव्यHimangi Sakhi Camp attacked : हिमांगी सखी यांच्या कॅम्पला घेराव घालत तरुणांकडून हल्लाBeed Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी 2 महिने पूर्ण, बाबांची खूप आठवण येते, मुलाची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! आनंदवन 75 वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांची माहिती
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! कॉर्पस फंडसाठी ही देवेंद्र फडणवीसांकडून भरघोस निधी  
Home Loan Interest Rates: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
Nandurbar : नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Beed Crime: वाल्मिक कराड एकटा बड्या पोलीस अधिकाऱ्यांना रोखू शकत नाही, संदीप क्षीरसागरांनी पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची मदत, पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
Embed widget