एक्स्प्लोर

Maharashtra News Live Updates : Kirit Somaiya : किरीट सोमय्याला ईडीकडून कमिशन मिळत; चंद्रकांत खैरे यांचा आरोप

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Live Updates : Kirit Somaiya : किरीट सोमय्याला ईडीकडून कमिशन मिळत; चंद्रकांत खैरे यांचा आरोप

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

चंद्रपुरात यंदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फिल्म फेस्टिवलचे आज उद्घाटन होणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनतर्फे 21 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे. 

 

स्व.किशनलालजी प्रेमचंदजी काठोटीवाले ( बडे पहेलवान) यांच्या स्मृतिद्वाराचे लोकार्पण

जालना येथे स्व.किशनलालजी प्रेमचंदजी काठोटीवाले ( बडे पहेलवान) यांच्या स्मृतिद्वाराचे लोकार्पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानव यांच्या हस्ते होणार आहे. 

नाशिकमध्ये आज रहाडीचे पूजन

नाशिकची पेशवेकालीन रहाडी मधील रंगपंचमी रविवारी साजरी होणार आहे... आज रहाडीचे पूजन, साफसफाई रंगपंचमीची तयारी केली जाणार आहे. 

 जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनतर्फे 21 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनतर्फे 21 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे...  सायंकाळी 5 वाजता जळगाव शहरातील सागर पार्क येथे हा शुभारंभ होईल

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पूर्वपट्ट्यातील पाणीटंचाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.

नागपूरमध्ये करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन 

शालेय विद्यार्थी करणार करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन..  श्री गुरु मंदिर परिवारातर्फे सकाळी 8 वाजता करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन रेशीम बाग परिसरातील भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे... या उपक्रमात नागपुरातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत

चंद्रपुरात 35 वे 2 दिवसीय महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन

आजपासून चंद्रपुरात 35 वे 2 दिवसीय महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन होणार आहे… राज्यभरातून येणार पक्षिमित्रांची मांदियाळी... वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कार्यक्रमाला उपस्थिती... जिल्ह्यातील ‘माळढोक’ व ‘सारस’ पक्षी संरक्षण व संवर्धनावर होणार चर्चा, भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 अमरावतीत दोन दिवसीय फगवा महोत्सवाच आयोजन

मेळघाटात पर्यटन संचालनालयातर्फे दोन दिवसीय फगवा महोत्सवाच आयोजन मेळघाटातील धारणी तालुक्यातील मौजे कोठा येथील ग्रामज्ञानपीठ बांबू केंद्र येथे करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजता खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ होईल...  मेळघाटातील आदिवासी संस्कृतीचे सौंदर्य जगासमोर आनणे हा या मागचा उद्देश आहे. आदिवासी बांधवांच्या नृत्य स्पर्धा, कोरकू संस्कृती दर्शन, नैसर्गिक रंग तयार करण्याची प्रात्यक्षिके, जंगल भ्रमण, जंगल सफारी असे अनेक ठळक उपक्रमांच आयोजिन करण्यात आले आहे. 

 पंतप्रधान  “पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान- पीएम विकास” या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च 2023 रोजी, “पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान” पीएम विकास या योजनेबद्दल होणाऱ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सकाळी 10 वाजता मार्गदर्शन करणार आहेत. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित लोकांकडून सूचना, सल्ले आणि कल्पना जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या 12 वेबिनार मालिकेपैकी हे एक वेबिनार असेल.“पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान” म्हणजेच, पीएम विकास या योजनेचे उद्दिष्ट, कारागीर/कलाकाराना देशांतर्गत तसेच जागतिक पुरवठा साखळीशी जोडून देत, त्यांच्या  वस्तू/सेवा/उत्पादने यांची गुणवत्ता सुधारणे, त्यांची संख्या (प्रमाण) वाढवणे असे आहे.

या वेबिनार मध्ये चार चर्चात्मक सत्रे होणार असून त्यांच्या संकल्पना खालीलप्रमाणे असतील :
1.      रास्त दरात वित्तीय सेवा उपलब्ध करणे, यात डिजिटल व्यवहारांवर विशेष सवलत आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश असेल.
2.     अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण आणि आधुनिक साधने तसेच तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे. 
3.      देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठाशी जोडून त्यांना विपणन प्रक्रियेत मदत करणे.
4.      योजनेचे स्वरूप, लाभार्थ्यांची ओळख पटवणे आणि अंमलबजावणी आराखडा.

21:55 PM (IST)  •  11 Mar 2023

Kirit Somaiya : किरीट सोमय्याला ईडीकडून कमिशन मिळत; चंद्रकांत खैरे यांचा आरोप

 भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ईडीचे दलाल असून इन्कम टॅक्स विभागाला ज्याप्रमाणे खबऱ्यांना काहीतरी द्यावं लागतं तसेच सोमय्याचं काम आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. 

17:20 PM (IST)  •  11 Mar 2023

छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी नदीत चार जण बुडाले

छत्रपती संभाजीनगर येथे अहमदनगर रोडवरील कायगाव टोका प्रवरासंगम गोदावरी नदीत चार जण बुडाले आहेत. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील चार तरुण मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. गोदावरी नदीत अंघोळीसाठी उतरले, सुरुवातीला दोन जण बुडाले, त्यांना वाचवण्यासाठी दोघे गेले होते. तेही बुडाले आहेत. बुडालेल्या चारही तरुणांचा शोध सुरू आहे. 

15:26 PM (IST)  •  11 Mar 2023

Ahmednagar Fire : तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्टोअर रूम आग

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील जुन्या स्टोअर रूमला अचानक आग लागली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले आहे. आगीत स्टोअर रूम मध्ये जुने साहित्य आणि मुदत संपलेली औषधे जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. यापूर्वीही या आरोग्य केंद्रात आग लागल्याची घटना होती.
15:26 PM (IST)  •  11 Mar 2023

Thane Kachrali Lake Boat Issue : कचराळी तलावात मद्यधुंद अवस्थेत अडकलेल्या युवकाची अखेर सुटका

Thane News : ठाण्यातील कचराळी तलावात असलेल्या सुरक्षा रक्षकांना सकाळी उजाडल्यावर तलावाच्या मधोमध फायबरबोट आढळली. इतक्या सकाळी अचानक ही फायरबोट तलावात कशी गेली याचा विचार करत असतानाच त्यात एक युवक बसेलला असल्याचं त्यांचा लक्ष्यात आल. सुरक्षारक्षकांनी त्या युवकाला तलावाच्या काठावर येण्यासाठी ओरडायला सुरुवात केली मात्र तो काही प्रतिसाद देईना तेव्हा लक्षात आलं, हा महाशय मद्यधुंद अवस्थेत आहेत आणि त्याच नशेत चक्क फायबर बोट घेऊन तलावात गेला आणि तिथेच अडकून पडला. तात्काळ महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाचारण करण्यात येऊन जवनांनी तलावात उतरून अखेर त्या मद्यधुंद तरुणाला बाहेर काढलं. सदर तरुणाचे नाव अक्षय दुबे असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
15:24 PM (IST)  •  11 Mar 2023

Sambhaji Brigade Morcha : इम्तियाज जलील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्रोह मोर्चा

खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात 14 मार्चला संभाजी ब्रिगेडच्या वतीने तुळजापूरला विद्रोह मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतरण करून त्यावर शिक्कामोर्तब केला. असे असताना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या शहरांच्या नावाला विरोध करणाऱ्या, औरंगजेबाचे फोटो कार्यक्रमात लावून त्याचे उदातीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्रोह मोर्चा तुळजापूर येथे आयोजित केलेला आहे. या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेला रथ मोर्चाबरोबर मार्गक्रमण करणार आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Ratan Tata Sad Demise  : उद्योगपती रतन टाटा यांना शरद पवारांकडून श्रद्धांजलीABP Majha Headlines :  7  AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM On Ratan Tata Sad Demise : रतन टाटा एक दयाळू आत्मा आणि विलक्षण मानव होते यांच्या निधनाने दु:खDeepak Kesarkar on Ratan Tata Sad Demise : रतन टाटा यांचं निधन, सरकारने जाहीर केला एक दिवसाचा दुखवटा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Embed widget