एक्स्प्लोर

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा  अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली आहे. 

Ratan Tata Passed Away : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी दिर्घ आजारानं त्याचं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्वचत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय. नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा  अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली आहे. 

रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा  अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते.  त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

रतनजी टाटा हे भारताचा अभिमान

रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील.  रतनजी टाटा यांनी अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना टेकओव्हर करुन व्यवसाय वाढवला. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांतही त्यांनी दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सळाळते चैतन्य निर्माण केले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास करण्याची टाटांची विचारधारा आणि परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. रतनजी टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी होती. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. 

त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहिल

1991 मध्ये रतनजी टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यांनी टेल्को (नंतर टाटा मोटर्स) ची कार निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. तसेच, टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केले. 2012 मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते. 2008 च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

अनमोल 'रतन'! हिमालयाला हुंदका, साधेपणावर देश फिदा, भारतीय उद्योग जगताचा पितामह, रतन टाटांची कारकीर्द बघा, सलाम ठोकाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Embed widget