देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
ज्येष्ठ उद्योगपती आणि रतन टाटा (Ratan Tata) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी दिर्घ आजारानं त्याचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जातेय.
Ratan Tata Passed Away: ज्येष्ठ उद्योगपती आणि रतन टाटा (Ratan Tata) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी दिर्घ आजारानं त्याचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जातेय. औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
रतन टाटा यांनी गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवलं : शरद पवार
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात शरद पवार यांनी रतन टाटा यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रतन टाटांमुळं असंख्य लोकांचं जीवन बदललं, त्यांचं जाणं धक्कादायक : नितीन गडकरी
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. देशाच्या एका अभिमानास्पद सुपुत्राचं निधन झालं आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ, मला त्याच्याशी वैयक्तिक आणि जवळचे कौटुंबिक नातेसंबंध जोडता आहे. त्यांच्यात नम्रता, साधेपणा होता. तसेच त्यांच्यात प्रत्येकासाठी प्रामाणिक आदर पाहिल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सचोटी आणि करुणा या मूल्यांना मूर्त रूप दिले. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली., त्यांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानामुळे आणि रोजगार निर्मितीमुळे असंख्य लोकांचे जीवन बदलले. त्यांच्या व्यावसायिक कौशल्याच्या पलीकडे, ते एक समर्पित देशभक्त आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक नेता होते, त्याचा समाजावर खोलवर परिणाम झाल्याचे गडकरी म्हणाले. त्यांचे आपल्यातून जाणं हे आपल्या देशासाठी दु:ख घटना आहे, कारण आपण एक दूरदर्शी आणि दयाळू मार्गदर्शक गमावला आहे. ओम शांती.
रतन टाटा हे देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व : पृथ्वीराज चव्हाण
रतन टाटा हे देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व होतं. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी येवा देण्याचं मोठं काम केल केलं आहे. त्यांचं आपल्यातून जाणं ही दु:खद घटना आहे, असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
रतन टाटा हे विश्वास आणि औदार्याचे प्रतिक : सुप्रिया सुळे
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली. त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.