BJP: भाजपा पदाधिकाऱ्याची वारंवार शरीरसुखाची मागणी, ठार मारण्याचीही धमकी; गुन्हा दाखल झाल्याने कार्यकर्त्यांचा मोर्चा

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Jun 2023 10:44 PM
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवास करताय? टायर तपासून घ्या, परिवहन विभागाकडून मोफत टायर तपासणी केंद्र सुरू
Samruddhi Mahamarg : वाहनांच्या सुरक्षेसाठी समृध्दी महामार्गावर टायर तपासणी केंद्र आजपासून सुरू करण्यात आले आहे. वाहनधारकांसाठी ही नवीन सुविधा असणार आहे. यामुळे टायर फुटून अपघात होण्याच्या घटना टाळता येणार असल्याचे म्हटले जात आहे. Read More
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती; विभागाच्या अधिपत्याखालील  512 पदे भरण्यात येणार होती

लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 30 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

BJP: भाजपा पदाधिकाऱ्याची वारंवार शरीरसुखाची मागणी, ठार मारण्याचीही धमकी; गुन्हा दाखल झाल्याने कार्यकर्त्यांचा मोर्चा
BJP Dombivli: आपल्याच पक्षातील महिला कार्यकर्तीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याविरोधात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय दबावाचा आरोप करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. Read More
Congress Mumbai President: भाई जगताप यांना विधान परिषद निवडणूक भोवली? मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून गच्छंती, वर्षा गायकवाडांकडे धुरा
Congress Mumbai President: मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना हटवण्यात आले असून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
Maharashtra ST : संसाराबरोबर एसटीचा प्रवास सुरु, एसटी इतिहासातील सुवर्ण दिवस, महिला चालकांनी चालवली पहिली एसटी बस ! 
Maharashtra ST : राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एसटी महिला चालक रुजू झाल्या आहेत. Read More
Miss World 2023: यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे यजमानपद भारताकडे, 27 वर्षांनी मिळाला भारताला बहुमान
Miss World 2023: यंदा होणाऱ्या मिस वर्ल्ड या स्पर्धेचे यजमानपद भारत भूषणावर आहे. तसेच जवळपास 27 वर्षांनी भारताकडे हा बहुमान आला आहे. Read More
Nashik Women Driver : टेम्पो चालवून कुटुंबाचं चालवलं, आज लालपरीचं स्टेअरिंग हाती आलं, नाशिकच्या माधवी साळवे कशा बनल्या एसटी ड्रायव्हर? 
Nashik Women Driver : नाशिकमधील (Nashik) माधवी साळवे यांना पहिली महिला एसटी चालक होण्याचा मान मिळाला आहे. Read More
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात; एक दिवसाचे वेतन देणार
Unseasonal Rains: राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. Read More
आमदार नितेश राणे यांच्या भाषणापूर्वीच वादळ आल्याने पेंडॉल उडाला 

आमदार नितेश राणे यांच्या भाषणापूर्वीच वादळ आल्याने पेंडॉल उडाला आहे. त्यामुळे अर्ध्यावर कार्यक्रम बंद करण्याची वेळ आली. 
भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने जनसंपर्क अभियान कार्यक्रम निमित्त अमरावतीच्या नांदगावपेठ येथील टेक्सटाइल पार्क याठिकाणी "विकास तिर्थ" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

Sharad Pawar:  संजय राऊतांना धमकी देणारे दोनजण ताब्यात, तर पवारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Sharad Pawar:  संजय राऊत यांनी धमकी दिल्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, पवारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. Read More
शरद पवार यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

शरद पवार यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


कलम 153 A आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात केल्या गुन्हा दाखल झालाय. मुंबई गुन्हे शाखेचे युनिट 2 करत आहेत तपास.


 

Innovation: सात महिन्यांची मेहनत, 65 हजार रुपये खर्च, कोपरगावच्या पोरांनी शेतकऱ्यांसाठी बनवलं भन्नाट यंत्र 
Ahmednagar News : कोपरगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी पेरणी यंत्र बनवले आहे. Read More
Kolhapur Violence: शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापूर दंगलीत होरपळूनही पोलिसांना नाकाबंदी करण्याचा 'आदेश'च नव्हता!
Kolhapur News : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी दंगल सदृश्य परिस्थिती होऊन दगडफेक करण्यात आली होती. तब्बल तीन ते चार तास शहरात थरकाप उडाला होता. दुसऱ्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची घोषणा करण्यात आली होती. Read More
Maharashtra: हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे जंगलराज; काँग्रेसची टीका
Violence In Maharashtra: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे जंगलराज सुरू असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. Read More
Mira Road Crime : मला 'ती' मामा म्हणायची, आरोपीच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे; मृत महिला सरस्वती नेमकी कोण?
Mira Road Crime : मृत महिला सरस्वती आपल्याला मामा म्हणायची असा दावा मिरारोड घटनेतील आरोपी मनोज सानेनं केला आहे. Read More
Kolhapur Crime: सांगलीनंतर कोल्हापुरात भरदिवसा सशस्त्र दरोडा, गोळीबार करत ज्वेलर्समधून सुमारे पावणेदोन कोटींची लूट
Kolhapur Crime : करवीर तालुक्यातील बालिंग्यामधील कात्यायणी ज्वेलर्स या सराफ पेढीवर सशस्त्र दरोडा पडला. चार सशस्त्र दरोडेखोरांनी काल (8 जून) भरदिवसा गोळीबार करत कात्यायनी ज्वेलर्समधील पावणेदोन कोटींचे दागिने लुटून नेले. Read More
Ayesha Shroff: जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफची सांताक्रूझ पोलिसात तक्रार, 58.53 लाखांची फसवणूक झाल्याचा दावा; काय आहे प्रकरण?
पोलिसांनी सांगितले की, आयेश श्रॉफनं (Ayesha Shroff) दावा केला आहे की, तिची 58.53 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. Read More
पवारांपाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अन् त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही धमकी; मुंबई पोलिसांची माहिती
MP Sanjay Raut: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. Read More
'त्या' तरुणीवर लैंगिक अत्याचार नाही? शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती, DNA अहवालाची प्रतीक्षा
Marine Drive Hostel Crime Case: मरीन ड्राईव्ह हत्या प्रकरणात नवी बाब समोर आली आहे, तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Read More
भारतातील 'या' गावात महिला परंपरा म्हणून राहतात निर्वस्त्र, काय आहे यामागचं कारण?
Himachal Pradesh Village : भारतामध्ये एक असं गाव आहे, जिथे महिला कपडे परिधान करत नाहीत. ही परंपरा फार पूर्वीपासून सुरु असून आजतागायत सुरु आहे. Read More
Nashik Sunita Dhangar : लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर अखेर निलंबित, आज जामीन अर्जावर सुनावणी
Nashik Sunita Dhangar : नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना निलंबित करण्यात आले आहे.  Read More
पंढरपूर अर्बन बँकेच्या 22 ATM मधून तब्बल 3 कोटी 30 हजारांची रोकड लंपास; पोलिसांत गुन्हा दाखल
Solapur Crime News: दी. पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेच्या विविध 22 शाखांमधील एटीएममधून तीन कोटी तीन हजार रुपये अज्ञात चोरट्यानं लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Read More
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा नगर जिल्ह्यात प्रवेश, तर मुक्ताबाईंच्या पालखीचं आज देऊळगाव राजाकडे प्रस्थान
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा सातवा दिवस आहे. Read More
मिरारोड प्रकरणातील आरोपी HIV पॉझिटिव्ह; चौकशीतून धक्कादायक खुलासा, पोलीस म्हणतात...
Mumbai Mira Road Murder Case : मनोजनं तो HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती पोलिसांना दिली. यामुळेच त्याच्यात आणि सरस्वतीमध्ये तणाव होता, असंही तो म्हणाला. परंतु, पोलिसांचं म्हणणं आहे की, मनोज हत्येच्या आरोपांखाली अटकेत आहे. तो सातत्यानं वेगवेगळे दावे करून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करत आहे. Read More
Kolhapur News : कोल्हापुरात इंटरनेट सेवा पूर्ववत, खोळंबलेले व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात
Kolhapur News : कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा आता पूर्ववत झाली आहे. Read More
सोलापूर-तुळजापूर रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग, आगीमुळे परिसरात धुराचे लोट

Solapur Fire:  सोलापूर-तुळजापूर रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहे. धुरामुळे सोलापूर-तुळजापूर महामार्गवरील वाहन चालकांना त्रास होत आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनतर्फे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मागील वर्षी देखील अशाच पद्धतीने कचरा डेपोला आग लागली होती 

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी


राष्ट्रवादीच शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला


खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं


जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात सुनावणी सुरू आहे. आज अॅड. प्रकाश आंबेडकर आपलं प्रतिज्ञापत्र सादर करु शकतात. सोबत इतर दोन साक्षीदारांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे. तर दुसरीकडे सॅम डिसूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं दाखल केलेल्या कथित खंडणी वसुली प्रकरणात सॅम डिसुजा सहआरोपी आहे. हायकोर्टानं डिसूजाला अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. 





निलेश राणे यांच्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे 'जेल भरो' आंदोलन 




 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सकाळी 11 वाजता माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशन येथे "जेलभरो" आंदोलन करण्यात येणार आहे. रिपोर्टर - निलेश
 
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबणार 


केरळात मान्सून दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. दरवर्षी 7 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. मात्र आलेल्या बिपारजॉय चक्रीवादळामुळे बाष्प ओढल्या गेल्याने मान्सून महाराष्ट्र आणि मुंबईत कधी दाखल होणार याबाबत अनिश्चितता आहे. मात्र साधारण 15 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि 15 ते 17 जूनपर्यंत होत मुंबईत दाखल होऊ शकतो अशी माहिती आहे.
 
पुण्यातील पालखी मार्गाची मंत्री रविंद्र चव्हाण करणार पाहणी 


सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालखी मार्गाची सकाळी 11 वाजता, सासवड ते पंढरपूर रस्तेमार्गे पाहणी करणार आहेत. यावेळी ते पालखी थांबा आणि मुक्कामाच्या ठिकाणाचा आढावा घेणार आहेत. वारकऱ्यांसाठी असलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी करणार आहेत. 
 
हिंगोली – संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. संत नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथून निघणार असून या पालखीमध्ये जवळपास 200 वारकरी सहभागी होणार आहेत.
 
नाशिक ते पंढरपूर सायकल वारी


सायकल वारी आज नाशिकहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून यंदाचे त्यांचे हे अकरावे वर्ष आहे. आज सकाळी 6 वाजता गोविंदनगर परिसरात जवळपास तीनशे सायकलिस्ट एकत्र येऊन आरती करणार आणि त्यानंतर वारीला सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी पावणे दोनशे किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अहमदनगरला मुक्काम असणार आहे. 10 जूनला पंढरपूरला नाशिकसह राज्यभरातून जवळपास 4 हजार सायकलिस्ट एकत्र येणार असून 11 जूनला सकाळी प्रभात फेरी काढली जाईल आणि त्यानंतर विठूरायाचे दर्शन घेऊन रात्री सायकलिस्ट माघारी फिरतील. नाशिकचे सायकलिस्ट 200 झाडे सोबत घेऊन पंढरपूरला वृक्षारोपण करणार आहेत.
 
सोलापूर – नांदेड, लातूर आणि मुंबई येथे दलित अत्याचाचाराच्या घटना गेल्या काही दिवसापासून घडतायत. याच्याच निषेधार्थ अन्याय अत्याचार विरोधी कृती संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. 
 
नाशिक – आरोग्य विज्ञान विद्यापीठचा रौप्य महोत्सवी दोन दिवसीय कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होणार आहे. आजच्या सत्रात किरण बेदी उपस्थित राहणार असून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


अहमदनगर – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये आषाढी वारी नियोजन, तयारी आढावा बैठक होणार आहे.
 
जळगाव – आदिवासी एकता परिषदेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता भुसावळ येथे पत्रकार परिषदा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता फैजपूर येथे सभा होणार आहे.
 
धाराशिव – छोट्या छोट्या बाबी लक्षात घेवून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्यासाठी मोजदाद करण्याचे काम सूरू झाले आहे. दहा वर्षापासून हे काम झालेले नव्हते. आरबीआय सोने वितळवून घेईल. श्री तुळजाभवानी मंदीराकडे भाविकांनी दानपेटी आणि पावती माध्यमातून सुमारे 200 किलो सोने, चार हजार किलो चांदी अपर्ण केले असण्याची शक्यता आहे. हे सगळे ऐवज मोजण्यासाठी जवळपास एक महिनाभर लागेल. 
 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.