एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Women Driver : टेम्पो चालवून कुटुंब चालवलं, आज लालपरीचं स्टेअरिंग हाती आलं, नाशिकच्या माधवी साळवे कशा बनल्या एसटी ड्रायव्हर? 

Nashik Women Driver : नाशिकमधील (Nashik) माधवी साळवे यांना पहिली महिला एसटी चालक होण्याचा मान मिळाला आहे.

Nashik Women Driver : आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. कोणतीही गोष्ट असो पुरुषांप्रमाणे महिला देखील अनेक क्षेत्रात झेंडा रोवतांना दिसून येत आहे. आपल्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रम याला आत्मविश्वासाची जोड देत नाशिकमधील (Nashik) माधवी साळवे यांना पहिली महिला एसटी चालक होण्याचा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे आपल्याच जिल्ह्यात त्यांची चालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळात अनेक महिला चालक रुजू झाल्या आहेत. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालकाने बस चालवली आहे. राज्यातील अनेक भागात 206 महिला चालकांनी एसटी स्टिअरिंग हाती घेत नवा प्रवास सुरु केला आहे. यातीलच एक महिला चालक या नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील आहेत, म्हणजे बिल्ला. क्र.41744 माधवी संतोष साळवे (Madhvi Salve) होय. माधवी साळवे या नाशिकमधील पहिल्या एसटी ड्रायव्हर ठरल्या आहेत. माधवी यांची देखील एसटी ड्रायव्हर म्हणून नियुक्ती झाली आहे. खेड्यापाड्यात अवघड रस्त्यावर त्या अगदी सफाईदार पद्धतीनं बस चालवत आहेत. काल नाशिक ते सिन्नर (Nashik To Sinner) या मार्गावर प्रथमच त्यांनी एसटी महामंडळाची बस चालवली.

एसटीमध्ये सरळ सेवा भरती (ST Exam) सन – 2019 अंतर्गत चालक तथा वाहक पदासाठी भरती झाली होती. आता महिला चालक कम वाहक पदाकरीता एकूण 206 महिला उमेदवारांची भरती झाली होती. या महिला चालकांना एक वर्षांचे अवजड वाहनाचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. यात माधवी यांनी देखील हे वर्षभराचे खडतर प्रशिक्षण पार केले. माधवी या गृहिणी असून घरात असताना शेती कामात वाहन चालविण्याची आवड होती. तेव्हा त्या घरी असलेला टेम्पो चालवत असत.  त्यांनतर एसटी महामंडळात चालकाची नोकर भरती निघाली. त्यांनी घरच्यांना याबाबत विचारणा केली. त्यानंतर कुटुंबीयांनी देखील याला संमती दिली. त्यानुसार माधवी यांची 2019 च्या भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक या पदासाठी निवडल्या गेल्या होत्या. 

एक वर्ष कठोर मेहनत 

एसटी महामंडळाने स्वत:च्या खर्चाने त्यांना हेवी व्हेईकलचे एक वर्ष ट्रेनिंग दिले. पुढे त्यांनी एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचा सराव केला. त्यानंतर त्यांची रीतसर एसटी बसवर चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करून घेण्यात आलं आहे. माधवी यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत देऊन तेवढ्यावरच न थांबता राज्य परिवहनने त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी दिली आहे. एसटी महामंडळाच्या उपक्रमाची नागरिक प्रशंसा करत आहेत. महिला सक्षमीकरण्याच्या दिशेने हे आश्वासक पाऊल असल्याचंही बोललं जात आहे. सिन्नर आगारातील सर्व कर्मचारी तसेच नाशिक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया माधवी यांनी यावेळी दिली.

प्रयत्न करत रहा, यश हमखास मिळते.... 

एसटीच्या अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले असतानाच माझ्या गावाजवळील तालुक्याच्या ठिकाणी माझी चालकपदी नियुक्ती झाल्यामुळे मला आणि पती संतोष व परिवाराला खूप आनंद झाला आहे, या माध्यमातून मला माझ्या तालुक्यातील प्रवाशी नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली. ही सेवा आपण प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगतानाच या माध्यमातून मी माझ्या नाशिक जिल्ह्यातील सर्व मुलींना आवाहन करू इच्छिते की, आपल्या अंगी असलेल्या जिद्द आणि चिकाटीला आत्मविश्वासाची जोड दिल्यास यश आपल्या पाठीशी उभे राहते. प्रयत्न करत रहा, यश हमखास मिळते असा विश्वास जागवत माधवीने मुली, महिला  कुठेच मागे नसल्याचा एक आदर्श इतर तरुणाई समोर घालून दिला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget