एक्स्प्लोर

Innovation: सात महिन्यांची मेहनत, 65 हजार रुपये खर्च, कोपरगावच्या पोरांनी शेतकऱ्यांसाठी बनवलं भन्नाट यंत्र 

Ahmednagar News : कोपरगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी पेरणी यंत्र बनवले आहे.

Ahmednagar Student Innovation : शेतकऱ्यांना पेरणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत कोपरगाव मधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी पेरणी यंत्र बनवले असून या यंत्राला देशपातळीवर झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे मजूर मिळत नसताना आणि वेळ वाचविण्यासाठी या यंत्राचा मोठा उपयोग भविष्यात बळीराजाला होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतीपूरक तयार केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा नुकतीच सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसई) या जागतिक संस्थेच्या भारतातील एक्सपर्ट इंडिया संस्थेमार्फत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात घेण्यात आली. यात कोपरगावमधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्वयंचलित बहुउपयोगी रोप पेरणी यंत्राने अव्वल स्थान पटकावून देश पातळीवर यश मिळवले आहे.. 

दुसऱ्या, तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या 25 जणांच्या टीमने हा प्रकल्प पूर्ण केला असून एकाच वेळी टोमॅटो, मिरची, वांगी यासह विविध रोपांसाठी दोन सऱ्या पाडून त्या सऱ्यांच्या मधील भरवशावर रोपाची लागवड होणार आहे. याचबरोबर रोपाभोवती मल्चींगपेपर अंथरत रोपाच्या शेजारून ठिबक सिंचनाची नळीही पसरली जाऊ शकते, अशी माहिती तुषार घुमरे म्हणाला या विद्यार्थ्यांने दिली आहे. 

सात महिन्याची मेहनत, 65 हजार रुपये खर्च 

हे यंत्र बनविण्यासाठी गेल्या मेहनत घेतली आहे. हे यंत्र तयार करण्यासाठी जवळपास 65 हजार रुपये खर्च आला आहे.. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्व्हे करून हे यंत्र तयार केलं आहे. देशभरातील 28 संघ अंतिम फेरीत आले होते. त्यात शेवटच्या फेरीत 15 संघात झालेल्या स्पर्धेत संजीवनीला यश मिळालं असल्याच शिक्षक इमरान सय्यद यांनी सांगितलं आहे. माझे आई वडील शेतकरी असून आमची 25 एकर शेती करताना मजूर मिळत नव्हते. त्यामुळे आज यंत्र बनविल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी काही तरी केलं, हे सांगायला अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया ईश्वरी शिंदे या मुलीने दिली आहे. 

वेळेसच पैशाचीही बचत 

संजीवनी शैक्षणिक संस्थेचे संचालक नितीन कोल्हे म्हणाले कि, हा प्रकल्प करताना विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट घेतले असून प्रॅक्टिकल आणि थेरोटीकल याचा मेल म्हणजे ज प्रकल्प असल्याच्या भावना संजीवनी समूहाचे संचालक नितीन कोल्हे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे हे यंत्र ट्रक्टरला लावून ओढता येणार असून  एक एकर जमिनीत पारंपारीक पद्धतीने लागवड करायची झाल्यास सुमारे 10000 इतका खर्च येतो. एक ते दीड दिवस खर्च होतो. या यंत्रामुळे वेळेची बचत तर होईलच, मात्र एकाच वेळी अनेक कामे होणार असल्याने पैशाची सुद्धा बचत होईल हे मात्र नक्की. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ABP MajhaMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टKalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यातMumbai : मुंबईत एका कंपनीत  बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Embed widget