भारतातील 'या' गावात महिला परंपरा म्हणून राहतात निर्वस्त्र, काय आहे यामागचं कारण?
Himachal Pradesh Village : भारतामध्ये एक असं गाव आहे, जिथे महिला कपडे परिधान करत नाहीत. ही परंपरा फार पूर्वीपासून सुरु असून आजतागायत कायम आहे.
![भारतातील 'या' गावात महिला परंपरा म्हणून राहतात निर्वस्त्र, काय आहे यामागचं कारण? why woman do not wear clothes in pini village of himachal pradesh weird tradition भारतातील 'या' गावात महिला परंपरा म्हणून राहतात निर्वस्त्र, काय आहे यामागचं कारण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/09/ebb4b62a625e75af680af8989e34fb031686294472265322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pini Village Tradition : आपल्या देशात विविध भागात वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात. भारतातील वेगवेगळी गाव आणि तेथील अनोख्या प्रथा-परंपरांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या प्रथेबाबत सांगणार आहोत. सध्याच्या आधुनिक जगात एकीकडे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सन्मानाने जगत आहेत. तर, दुसरीकडे देशाच्या काही कोपऱ्यांमध्ये महिलांना विचित्र प्रथा आणि परंपरांचं पालन करावं लागत आहे.
'या' गावात महिलांसाठी अनोखी परंपरा
भारातील एका गावामध्ये महिलांसाठी अशीच एक विचित्र परंपरा आहे. या गावामध्ये महिला कपडे घालत नाहीत. या गावातील महिला कायम निर्वस्त्र असतात असं नाही. तर वर्षातील पाच दिवस या महिलांना विना कपडे परिधान करता राहावं लागतं. कोणत्या गावात ही परंपरा आहे, हे गाव नेमकं कुठे आहे आणि या अनोख्या परंपरेमागचं कारण काय आहे, वाचा सविस्तर.
पाच दिवस महिला राहतात निर्वस्त्र
भारतात हिमाचल प्रदेशमध्ये हे छोटसं गाव वसलं. हिमाचलमधील मणिकर्ण घाटीमधील पिणी गाव आहे. या गावामध्ये ही विचित्र आणि अनोखी परंपरा पाळली जाते. ही परंपरा फार पूर्वीपासून सुरु असून यावर येथील लोकांचा विश्वास आहे. मीडिया रिपोर्टनुसार पिणी गावातील महिला वर्षातील पाच दिवस निर्वस्त्र राहतात. श्रावण महिन्यात ही परंपरा पाळली जाते. यावेळी गावातील कोणतीही महिला कपडे परिधान करत नाही. संपूर्ण गाव ही परंपरा पाळतो. ही परंपरा न पाळण्या महिलेवर देवाचा कोप होतो, असं येथील गावकरी मानतात.
पती-पत्नी राहतात एकमेकांपासून दूर
श्रावण महिन्यातील पाच दिवस पिणी गावातील महिलानिर्वस्त्र राहतात. यावेळी या गावाबाहेरील लोकांना गावात प्रवेशबंदी असते. हे पाच दिवस या गावातील महिला घराबाहेर पडत नाहीत. या काळात नवरा-बायको एकमेकांपासून दूर राहतात. पती-पत्नीला एकमेकांसोबत बोलण्याची आणि पाहण्याचीही परवानगी नसते.
पुरुषांसाठीही वेगळे नियम
फक्त महिलांसाठीच नाही तर, या गावातील पुरुषांनाही या काळात काही नियम पाळावे लागतात. या काळात पुरुषांना दारुचं सेवन करण्यास आणि मांस खाण्यास परवानगी नाही. येथील गावकरी मानतात की, जर कुणी ही परंपरा पाळली नाही तर, त्यावर देव नाराज होतात आणि त्याच्यासोबत काही वाईट घटना घडू शकतात.
काय आहे यामागचं कारण?
या अनोख्या परंपरेमागचा इतिहासही रंजक आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फार पूर्वी या गावावर राक्षसांनी कब्जा केला होता. गावातील सुंदर वस्त्रे परिधान करणाऱ्या विवाहित स्त्रियांना राक्षस पळवून नेत असतं. राक्षसांमुळे येथील गावकरी त्रस्त होते. यावेळी 'लहवा घोंड' देवता प्रकट झाली आणि त्यांनी राक्षसाचा वध करून गावकऱ्यांचं रक्षण केलं. देवतांनी असुरांचा वध करून स्त्रियांना राक्षसांपासून वाचवलं, तेव्हापासून ही परंपरा सुरू असल्याचं सांगितलं जातं.
संबंधित इतर बातम्या :
Trending News : 'इथे' लग्न झाल्यानंतर महिलांना कापावे लागतात कान अन् ओठ, विचित्र परंपरा आजही कायम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)