पवारांपाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अन् त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही धमकी; मुंबई पोलिसांची माहिती
MP Sanjay Raut: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
MP Sanjay Raut and MLA Sunil Raut Got Death Threat : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. संजय राऊतांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना एका अज्ञात व्यक्तीनं फोन केला होता. सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा अन्यथा तुम्हाला गोळ्या घालू, असं ही अज्ञात व्यक्ती म्हणाली. राऊतांनी मुंबई पोलिसांना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar Threat) यांना धमकी आली. त्यापाठोपाठ ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut Threat) यांनाही जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांचे बंधू आणि भांडूप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीनं हा फोन सुनील राऊतांना केला होता. सुनील राऊतांनी फोन उचलताच सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा, अन्यथा महिनाभरात तुम्हा दोघांनाही गोळ्या घालू अशी थेट धमकी या अज्ञात व्यक्तीनं संजय राऊतांना आणि सुनील राऊतांना दिली.
पाहा व्हिडीओ : Threat Call Sanjay Raut: फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी; राऊतांची पोलिसांना माहिती
संजय राऊतांनी तात्काळ याबाबत मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली. तसेच, या धमकीनंतर संजय राऊतांनी सरकारवर थेट आरोप केले आहेत. आमच्या जीवाचं काही बरं वाईट व्हावं, हीच सरकारची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मला वारंवार धमक्या येतात, मी चारवेळा गृहमंत्री फडणवीस यांना सांगितलंय : संजय राऊत
संजय राऊत पोलिसांना म्हणाले की, "मला वारंवार धमक्या येत आहे. याबाबत मी चारवेळा गृहमंत्र्यांना कळवलं आहे. एका गुंडाचे फोटो काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि त्यांच्या चिरंजीवांसोबत झळकतायत. त्यानं माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्याचे पुरावे मी गृहमंत्रालयाकडे पाठवले. पण त्यानंतर काही दिवसांनी मला कळालं की, मी पाठवलेल्या पुराव्यांबाबत काहीच कारवाई झाली नाही. पण त्या गुंडालाच पोलीस संरक्षण दिलं."
दरम्यान, धमक्यांच्या सत्रानंतर सरकारवर विरोधकांनी टीकेची उठवली आहे. तसंच राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sharad Pawar: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; ट्विटर हँडलरवर कारवाई करा, सुप्रिया सुळेंची मागणी