एक्स्प्लोर

Mumbai Metro : मरोळ स्थानकात प्रवाशांना मेट्रोतून खाली उतरवलं, पोलिसांचा तपास सुरू 

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

LIVE

Key Events
Mumbai Metro : मरोळ स्थानकात प्रवाशांना मेट्रोतून खाली उतरवलं, पोलिसांचा तपास सुरू 

Background

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

1904 : भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंग यांचा जन्म 

भगत पूरण सिंग यांचा जन्म 4 जून 1904 मध्ये पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील राजेवाल (रोहनो) येथे झाला. हिंदू कुटुंबात जन्माला आल्याने त्यांना लहानपणी रामजी दास हे नाव देण्यात आले. पुढे लहानपणीच त्यांनी शीख बनण्याचा निर्णय घेतला. ते लेखक,  प्रकाशक, एक पर्यावरणवादी होते. 

1936: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म 

अभिनेत्री नूतन बहल यांची आज जन्मदिवस. त्यांचा जन्म एका मराठी कुटुंबात 4 जून 1936 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील कुमारसेन निर्माते आणि दिग्दर्शक होते, तर आई शोभना अभिनेत्री होत्या. नूतन यांनी वयाच्या 9व्या वर्षी बालकलाकार म्हणून कुमार समर्थ यांच्या 'नलदमयंती' चित्रपटात काम केले होते.  1950 मध्ये त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षीच 'हमारी बेटी' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 11 ऑक्‍टोबर 1959 रोजी लेफ्टनंट कमांडर रजनीश बहलशी त्यांनी विवाह केला. 1955 मधे 'सीमा' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नायिकेचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. त्यांना एकूण 6 वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना वर्ष 1974 मधे पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांचे कर्करोगाने 21 फेब्रुवारी 1991 रोजी मुंबईत निधन झाले.

1946: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री आणि पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म

एस.पी. बालसुब्रमण्यम यांचा जन्म मद्रास इलाख्यातील (तत्कालीन, सध्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्हा) कोनेटमपेट या गावी झाला. संगीताचा वारसा त्यांना बालपणापासून लाभला. शालेय वयात त्यांनी संगीताचा अभ्यास सुरू केला आणि संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गंगाई अमरन, इलयाराजा, अनिरुद्ध , भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. एम. जी. रामचंद्रन, एम. जी. विश्वनाथन, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, या दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये गायक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सलमान खान यांच्या आवाजाशी साम्य असल्याने त्याच्या चित्रपटातील त्याच्या गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी सुब्रमण्यम यांना मिळाली. ही गाणी समाजात लोकप्रिय ठरली आहेत.

1947: विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 

आपल्या चेहऱ्यावरील विनोदी हावभावाच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीवर तब्बल चार  दशकांहून अधिक काळ विनोदी चित्रपट अभिनेते म्हणून अशोक सराफ यांनी राज्य केले. अशोक सराफ हे फक्त विनोदी अभिनेतेच नाहीत, तर गंभीर भूमिका सुद्धा ते तितक्याच चोखपणे बजावतात आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एक खट्याळ प्रियकर असो किंवा अगदी वयोवृद्धाची भूमिका असो, आपल्या सगळ्याच भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईत झाला. त्यांचे कुटुंब मूळचे बेळगावचे. परंतु, दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात ते लहानाचे मोठे झाले. 

1947: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन

आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी हे एक बौद्ध धर्माचे आणि पाली भाषेचे अभ्यासक आणि मराठी लेखक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) जाऊन त्‍यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. 

1989: चीनची राजधानी बीजिंगमधील तियानमन स्क्वेअर येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर लष्करी कारवाई

चीनमधील तियानमेन स्क्वेअरवर निशस्त्र तरुण आंदोलकांवर चिनी लष्कराने कारवाई केली. 4 जून 1989 रोजी चीनची राजधानी बीजिंग येथे चिनी सैन्याने नि:शस्त्र नागरिकांवर शांततापूर्ण निदर्शनं करत असताना बंदुका आणि रणगाड्यांचा वापर केला आणि यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले. ही घटना इतिहासात 'तियानमेन स्क्वेअर नरसंहार' म्हणून ओळखली जाते.

 

23:03 PM (IST)  •  05 Jun 2023

Mumbai Metro : मरोळ स्थानकात प्रवाशांना मेट्रोतून खाली उतरवलं, पोलिसांचा तपास सुरू 

वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील मरोळ स्थानकावर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आहे. मेट्रोमध्ये तपास सुरू आहे, पण अद्याप त्यामागचे कारण स्पष्ट झालं नाही. सुमारे अर्ध्या तासाहून जास्त वेळ प्रवाशांना मेट्रोतून बाहेर थांबवलं आहे. 

 

21:33 PM (IST)  •  05 Jun 2023

Washim News:  वाशिमच्या मानोरा बाजार समिती मध्ये तुरीला उच्चांक दर; प्रति क्विंटलला 11 हजार 111 रुपयांचा दर

Washim News:  वाशिमच्या मानोरा बाजार समिती मध्ये तुरीला उच्चांक दर मिळाला. मनोरा बाजार समितीत तुरीला प्रती क्विंटल 11 हजार 111 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा प्रथमच तुरीला प्रति क्विंंटल साडेदहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर तुरीला विक्रमी दर प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
 
17:05 PM (IST)  •  05 Jun 2023

Ahmednagar News:  अहमदनगर: औरंगजेबाचे फोटो झळकवल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News:  अहमदनगर शहरातील फकीरवाडा परिसरात दमबारा हजारी दर्ग्या चा सदंल उरुस होता यावेळी उरूस साजरा करत असताना या ठिकाणी डीजे लावण्यात आला होता यावेळी काही तरुण डीजेच्या तालावर नाचत असताना औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन घोषणा देत होते. यामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन ,द्वेष पसरेल असे कृत्य केल्याच्या आरोपावरून मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्य्द उर्फ सर्फराज जहागिरदार, अफनान आदिल शेख उर्फ  खडा, शेख सरवर,जावेद  शेख उर्फ गब्बर या तरुणांवर भिंगार पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वी.क  505 (2),298, 34 प्रमाणे  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

16:53 PM (IST)  •  05 Jun 2023

Shrikant Shinde : खा. श्रीकांत शिंदे मंगळवारी शिवसेना दादर शाखेला भेट देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मंगळवारी प्रभादेवी, दादर येथील शाखेला भेट देणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या मुंबईतील शिवसेना शाखा संपर्क अभियानाअंतर्गत भेट 'सामना'च्या दारात असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या शाखेला सायंकाळी 7 वाजता भेट देणार आहेत. त्यानंतर ते दादर भवानी रोड येथील शाखेला भेट देणार असून यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. 

11:51 AM (IST)  •  05 Jun 2023

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

प्रदीप शर्मा यांना अंतरिम जामीन मंजूर

आजारी पत्नीला भेटण्यासाठी तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget