Maharashtra News LIVE Updates : बीड: विद्यार्थ्यांच अपहरण करून 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना चार तासात पोलिसांनी केली अटक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
दिल्लीचे मुख्यमंत्री दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये वाव देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला, हाच केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवालांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटीची मोहिम हाती घेतली आहे त्या अंतर्गत केजरीवाल आज उद्धव ठाकरे दुपारी 4 वाजता तर आज शरद पवारांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत.
एकनाथ शिंदेंनी बोलावली पक्षातील खासदारांची बैठक
उद्धव ठाकरे लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढाव घेत आहेत. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित केलाय.
रात्री 8 वाजता वर्षा निवास्थानी होणाऱ्या बैठकीत शिंदे लोकसभा निहाय कामाचा आढावा घेणार आहेत.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु, मनोहर जोशी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार, जोशींची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
समीर वानखेडेंची आज पुन्हा सीबीआय चौकशी.
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांना सीबीआयनं आज बीकेसीतील मुख्यालयात पुन्हा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांच्या बरोबर द्विपक्षिय चर्चा करतील. दोन्ही नेत्यामधली ही एका वर्षातली पाचवी भेट असेल. आज ते ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड जॉन हर्ले आणि विरोधी पक्ष नेते पीटर डेटन यांची भेट घेतील.
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पत्रकार परिषद
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पत्रकार परिषद घेणार आहेत, सकाळी 11.30 वाजता. यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि अनुराग ठाकूर उपस्थित असतील.
मुक्ताई पादुका आणि विठ्ठल मूर्ती दर्शन सोहळ्याचे आयोजन श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. अनेक वर्षापूर्वी संत सखाराम महाराज यांना मुक्ताई पादुका भेट म्हणून मिळाल्या होत्या. या संत मुक्ताबाई यांच्या पादुका आणि विठ्ठल मूर्ती दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी मोठ्या संख्येने जुने श्रीराम मंदिर येथे गर्दी करणार आहेत
Thane: अनंत करमुसे मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांनी दाखल केलं सुमारे 500 पानांचं चौथं पुरवणी आरोपपत्र
Thane: ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांनी आणखीन एक पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 90 दिवसांत तपास करून हे चौथं पुरवणी आरोपपत्र ठाणे पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केलं आहे. 5 एप्रिल 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना त्यांचा बाबतीत आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर करमुसे यांच्या अकाऊंटवरून टाकले होते.
Nanded News: महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नांदेड जिल्ह्यातील पळसगाव अंधारात
Nanded News: नांदेडच्या नायगाव तालुक्यातील पळसगावात मागील एका महिन्यापासून विद्युत पुरवठा नाही. संपूर्ण गाव अंधारात असून विद्युत पुरवठा नसल्याने अनेक अडचणीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतोय. महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका या गावकऱ्यांना बसत आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रात्र जागून काढावी लगत आहे.अनेक वेळा महावितरण कंपनीकडे तक्रारी करण्यात आल्या. पण महावितरण कंपनीने पळसगाव येथील विद्युत पुरवठा अद्याप तरी सुरळीत केला नाही.त्यामुळे या गावातील नागरिक हैराण झाले आहेत.
Beed News: बीड: विद्यार्थ्यांच अपहरण करून 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना चार तासात पोलिसांनी केली अटक
Beed News: बीडमध्ये एका विद्यार्थ्यांच अपहरण करून त्याच्याकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपीला बीड पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये अटक केली आहे. मनीष क्षीरसागर आणि संतोष गिरी अस या दोन आरोपीचे नाव असून त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून एका विद्यार्थ्यांचं अपहरण केलं. त्याला आज्ञास्थळावर नेऊन बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडे वीस लाख रुपयांची मागणी केली. यावेळी या विद्यार्थ्याच्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण देखील करण्यात आली. आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर विद्यार्थ्यांने थेट पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासात दोन आरोपींना अटक केली असून त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
Mumbai Crime News: 11.30 लाखांच्या MD (मेफेड्रोन) सह दोघांना सायन परिसरातून अटक; अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटची कारवाई
11.30 लाखांच्या MD (मेफेड्रोन) सह दोघांना सायन परिसरातून अटक
अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटची कारवाई
फिलिप जगले (36) आणि अय्युब अब्दुल सय्यद (32) नावाच्या दोघांना अटक
सायन मिडास टॉवर जवळ गस्ती दरम्यान दोघे संशयस्पदरीत्या फिरताना आढळून आले
झडती दरम्यान 58 ग्रॅम MD जप्त
न्यायालयात हजर केले असता 26 मेपर्यंत पोलीस कोठडी
HSC Result 2023 Date : प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार
HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.