Mumbai Rains LIVE Updates : मुंबईतील पडझडीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, BMC ला सतर्क राहण्याचे आदेश
Maharashtra News LIVE Mumbai Rains Updates: मुंबईसह राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत तासाभरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला.
LIVE
Background
Maharashtra News LIVE Mumbai Rains Updates : मुंबईसह राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत तासाभरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला. वडाळा, दक्षिण मुंबईसह विविध भागात पडझडीच्या मोठ्या घटना घडल्या. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या धारा पाहायला मिळाल्या.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांचा अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने, अपघातामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक लोणावळा येथे पोलिसांनी बंद करत वाहतूक जुन्या मार्गावरून वळवली, मुंबईच्या दिशेने निघालेले अनेक नागरिकांना तासंतास वाहनात अडकून, वाहने धिम्या गतीने मुंबईच्या दिशेने सरकत आहेत
घाटकोपर दुर्घटनेत आतापर्यंत 47 जणांना बाहेर काढलं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून,…
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 13, 2024
CM Ekanth Shinde on Ghatkopar : अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणार : मुख्यमंत्री
घटना दुर्दैवी आहे, तात्काळ मदतीचे आदेश दिले, ३५ लोकांवर उपचार सुरु आहेत, होर्डिंग उचलण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे, रेस्क्यू करणं आणि लोकांना बाहेर काढणं याला प्राधान्य असेल, होर्डिंग जर अनधिकृत असतील तर त्यावर कारवाई करु, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला सांगितलं
दुर्घटनेच्या ठिकाणी तात्काळ मदत यंत्रणा पोहोचवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई आणि परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जिथे दुर्घटना घडल्या आहेत… तिथे तात्काळ मदत यंत्रणा पाठवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत
CM Eknath Shinde : मुंबईतील पडझडीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, BMC ला सतर्क राहण्याचे आदेश
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, तातडीनं उपचार करण्याचे दिले आदेश, आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिल्या सूचना,
मुंबई महानगरपालिकेला सतर्क राहण्याचे आदेश , नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन