एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 10th April 2023 : आरेतील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; 17 एप्रिलला होणार सुनावणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 10th April 2023 : आरेतील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; 17 एप्रिलला  होणार सुनावणी

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रील केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..

देशभर मॉकड्रील केले जाणार 

मुंबई/दिल्ली – कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रील केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही याची खात्री केली जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता जे जे रुग्णालयात, दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील होणार आहे.  
 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. आज कोर्टाच्या कामकाजात 39 नंबर वर प्रकरण आहे.गेल्या आठ महिने या प्रकरणावर सुप्रिम कोर्टात सुनावणी नाही. प्रकरण कामकाजाच्या यादीत पण प्रत्यक्ष सुनावणी होणार का याबद्दल पुन्हा चर्चा.

नितीन देशमुख आंदोलनाच्या पवित्र्यात 

अकोला – बाळापुरचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नावरून पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आपासून 21 एप्रिल पर्यंत अकोला ते नागपूर पदयात्रा काढणार आहेत. अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून यात्रेला सुरूवात करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत ही पदयात्रा असणार आहे. 21 एप्रिलला ही पदयात्रा नागपुरात पोहचेल. ते दररोज सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात दररोज 25 किलोमीटर अंतर पार करणार आहेत. त्यांच्यासोबत मतदारसंघातील जवळपास एक हजार लोक पदयात्रेत सहभागी आहेत. या पदयात्रेत एका टँकरमध्ये फडणवीसांची आंघोळ घालण्यासाठी या 69 गावातील जमा केलेल्या पाण्याचा टँकर ते सोबत घेणार आहेत.  
 
मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्याला ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण लवकरच ठाकरे गटाकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कदाचित आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या दौऱ्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे यांना याबाबत सूचक विधान केलं आहे. 
 

ठाणे – आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधीच्या महाराष्ट्रातील सभेची तारीख आणि स्थळ निश्चित केलं जाणार आहे. या बैठकीत प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी, राज्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, सकाळी 11 वाजता, राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे. रिपोर्टर – राजू (सकाळी 8.30 वाजता अल्पेश करकरे लाईव्ह)

फडणवीस अमरावती दौऱ्यावर 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित पुष्पांजली आणि अभिवादन कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर स्वातंत्र्य पूर्वकाळापासून शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि वऱ्हाडाचे भूषण ठरलेल्या शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेला यंदा 100 वर्षे पूर्ण होतायत त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दुपारी 12.30 वाजता सहभागी होणार आहेत. त्यानंतर रिद्धपुर येथे होणाऱ्या मराठी विद्यापीठाची पाहणी करतील.


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विमुक्त जाती भटक्या जमातीचे आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भटक्या जाती विमुक्त जमाती सेलचे जिल्हाध्यक्षांना बोलवलं आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित असतील तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दुपारी 1.30 वाजता बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. 

मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयानं तिघांना ईडीच्या कारवाईपासून दिलंल तूर्तास अंतरिम संरक्षण आहे कायम. मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्टात हसन मुश्रीफ यांची 3 मुलं, साजिद, आबीद आणि नाविद या तिघांनी केलाय अटकपूर्व जामीन अर्ज.


वर्धा – जिल्ह्यातील अल्लीपूर नजीकच्या मनसावली या गावात एका पीठ गिरणीने गावातील नागरिकांसाठी अनोखी योजना सुरू केलीये. ही पीठ गिरणी ग्राम पंचायतच्या मालकीची आहे. येथे ग्राम पंचायतीचा कर भरणाऱ्यास मोफत दळण दिले जाते. 100 टक्के कर भरा आणि दळण मोफत मिळवा. 

 
राजस्थान – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या पत्रकार परिषदेनंतर कॉग्रेस नेतृत्व सतर्क झालेय. प्रभार सुखजिंदर सिंह रंधावा राजस्थान मध्ये पोहचणार आहेत. यावेळी ते सचिन पायलट आणि मुख्यमंत्री गहलोत यांच्या बरोबर चर्चा करणार आहेत.

दिल्ली – गोधरा हत्याकांडीतील दोषींच्या जामिनावर सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत कोर्टाने गुजरात सरकारला दोषी प्रत्येक व्यक्तीची गुन्ह्यातील भुमिका स्पष्ट करायला सांगितली आहे.

-        किरिट सोमय्या पुण्यातील जंबो कोवीड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पुन्हा एकदा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विजय पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

परभणी – कारखाने बंद होण्याआधी उसाचे बिल द्या, 2021-22 पीक विमा, अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आमरण उपोषण केले जाणार आहे.


 मुंबई – मराठा क्रांती मोर्चा महामुंबईचं आंदोलन. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर मराठा समाजाच्या लाभधारक लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यांसाठी, तसेच महामंडळा तर्फे चालेल्या ढिसळ कारभारामुळे मराठा समाजाच्या उद्योजकांवर होणाऱ्या नुकसानाची जवाबदारी निश्चित करण्यासाठी, व्याज परतावे वेळेवर मिळावेत आणि कर्ज सुलभ होण्यासाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम पुर्णपणे लागू करण्यासाठी, आणि मराठा समाजच्याच मुलानं महामंडळाच्या नोकरीत समविष्ट करण्यासाठी तसेच निधी परत जाणार असेल तर ती कुणाची चुक? सरकारला दोष देण्यापेक्षा दिलेल्या सवलती का देण्यात येत नाही या सर्व मागण्यांसाठी, दुपारी 1 वाजता, किल्ला कोर्टाच्या पाठीमागे महामंडळाचे ऑफीस समोर. 

 बॉलिवूड स्टार नवाझऊद्दीन सिद्धिकीनं आपली पत्नी झैनाबविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सुनावणीत नवाझ आणि त्याच्या पत्नीनं आपापसातले वाद सांमज्यानं मिटवण्याचं कोर्टापुढे मान्य केलं होते. त्याबाबत आज हायकोर्टात आपले निर्देश जारी करणार.

-  मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्ंयाची समस्या आणि उघड्या मैनहोल्स संदर्भात दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी.

-        खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांनी सामना पेपरा बातमी छापून, मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत मागील तारखेस कोर्टात हजर न झाल्यानं, न्यायालयानं त्यांना ठोठावला होता एक हजार रुपये दंड. मात्र आज संजय राऊत शिवडी कोर्टात हजर राहण्याची शक्यता.

- मुंबई सत्र न्यायालयात सदानंद कदम याच्या जामीन अर्जावर सुनावणी. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम याना ईडीनं केली आहे अटक. मात्र कदम सध्या न्यायालयीन कोठडीत. मुंबई सत्र न्यायालयात कदम यांनी दाखल केलाय जामिनासाठी अर्ज. सदानंद कदम हे आमदार माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय.

आयपीएलमध्ये आरसीबी आणि लखनौ यांच्यामध्ये आज सामना होत आहे. 

23:02 PM (IST)  •  10 Apr 2023

Mumbai News: रश्मी उद्धव ठाकरे 19 बंगलो घोटाळा प्रकरणी अलिबागमधील कोर्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांना पोलिसांकडून अटक; भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांची माहिती

Mumbai News:  रश्मी उद्धव ठाकरे 19 बंगलो घोटाळा प्रकरणी अलिबागमधील कोर्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांना पोलिसांनी आज अटक केली; भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांची माहिती 

22:32 PM (IST)  •  10 Apr 2023

Yavatmal News : यवतमाळ: 25 टन साखरेसह ट्रकवर दरोडा; चालक, क्लिनरला केली मारहाण, करळगाव घाटातील घटना

Yavatmal News : दरोडेखोरांनी 25 टन साखरेसह ट्रकवर दरोडा टाकला. यावेळी ट्रक चालक व क्लिनरला मारहाण करून साखरेसह ट्रक घेवून पोबारा केला. ही पहाटे चार वाजताच्या सुमारास करगाव घाटात घडली. दरम्यान पोलिसांनी जलद गतीने तपासचक्र फिरवीत तीन संशयित आरोपींना अटक केली. तर चोरी गेलेला ट्रक वणी येथे पकडलेला आहे

20:32 PM (IST)  •  10 Apr 2023

Beed News: अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयातील लिपिकाला 37 हजार रुपयांची लाच घेताना अटक

Beed News: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयातील एका लिपिकास 37 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अशोक नाईकवाडे असं या लिपिकाचे नाव असून मयत कर्मचाऱ्यांच्या जागेवर अनुकंप तत्वावर त्याच्या पत्नीला नोकरीत नियुक्त करण्याची ऑर्डर काढून देण्यासाठी नाईकवाडे यांनी तक्रारदाराकडे 80 हजाराची लाच मागितली होती. यामधीलच 37 हजार रुपये घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशोक नाईकवाडे या लिपीकाला अटक केली आहे. 

20:22 PM (IST)  •  10 Apr 2023

Mumbai News:  आरेतील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; एमएमआरसीएलच्या प्रतिज्ञापत्रावर सोमवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश 17 एप्रिलला होणार सुनावणी

Mumbai News:  आरेतील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

याचिकाकर्त्यांना एमएमआरसीएलच्या प्रतिज्ञापत्रावर सोमवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश

17 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

मात्र याचिकेमुळे मेट्रो प्रकल्पाला उशिर होत असून दिवसाला 5.6 कोटींचं नुकसान होत असल्याचा अैडव्होकेट जनरल तुषार मेहतांचा दावा

हा खर्च याचिकाकर्त्यांकडून वसूल करण्याची सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयानं नाकारली

17:10 PM (IST)  •  10 Apr 2023

Mumbai News: बॉलीवूड गायक मिका सिंगची  मुंबई उच्च न्यायालयात धाव; 17 वर्षे जुना एफआयआर रद्द करण्याची मिकाची याचिकेतून मागणी

Mumbai News:  बॉलीवूड गायक मिका सिंगची  मुंबई उच्च न्यायालयात धाव

राखी सावंतच बळजबरीनं चुंबन घेतल्याबद्दल मिका सिंहविरोधात दाखल गुन्ह्याचं प्रकरण

17 वर्षे जुना एफआयआर रद्द करण्याची मिकाची याचिकेतून मागणी 

याप्रकरणी राखी सावंतला आपलं प्रतिज्ञापत्र दाखल करत भूमिका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश 

मिकाच्या याचिकेवर पुढील आठवड्यात पुन्हा होणार सुनावणी 

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget