एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Anil Jaysinghani Arrest : ईडीकडून अनिल जयसिंघानीला अहमदाबादमध्ये अटक, 10 हजार कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण 

Anil Jaysinghani Arrest : आयपीएल (IPL Money laundering) मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.

Anil Jaysinghani Arrest : आयपीएल (IPL Money laundering) मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी असून त्याला आता अहमदाबादमध्ये ईडी युनिटने अटक केली आहे. 

क्रिकेट बुकी म्हणून ओळख असलेल्या अनिल जयसिंघानी (Anil Jaysinghani) याला अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) युनिटने ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर 10 हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात समावेश असल्याचा आरोप आहे. ईडीने मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यातून जयसिंघानी याला ताब्यात घेतले आहे. जयसिंघानी हा मुंबईजवळील (Mumbai) उल्हासनगरचा असून तो 15 हून अधिक प्रकरणांमध्ये संशयित आहे. तथापी, सट्टेबाजी प्रकरणात त्याला तीन वेळा अटक झाली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जयसिंघानी यांच्या मुलीविरोधात लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात बेकायदेशीर अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने शुक्रवारी याचिका फेटाळून लावली. 

दरम्यान 2015 मनी लॉन्ड्रिंग प्रकरणा संदर्भात एका फेडरल एजन्सीद्वारे तपास सुरु असताना ईडीने कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडी जयसिंघानी याचा जबाब नोंदवत असताना शुक्रवारी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीकडून अहमदाबाद कोर्टात सुरु असलेल्या 2015 मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जयसिंघानी याची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असताना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर न्यायालयात जयसिंघानी यांच्या कोठडीची मागणी केली आहे. जयसिंघानी यांना नुकतेच मध्यप्रदेश पोलिसांनी कथित बुटलेगिंग प्रकरणात ताब्यात घेतले होते. 

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण काय? 

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात लाच प्रकरणात जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला अटक करण्यात आली होती. अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित झाले. त्यानंतर अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना विनंती केली की, वडिलांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांना गुन्हे किंवा तक्रारीमधून वाचवावे. मात्र या गोष्टीला अमृता फडणवीस यांनी नकार दिल्याने अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असे हे प्रकरण आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Embed widget