Anil Jaisinghani : अनिल जयसिंघानीचं 15 हजार कोटींचे मॅचफिक्सिंग नेटवर्क उघडकीस, पोलिस तपासाला वेग
Anil Jaisinghani : बुकी अनिल जयसिंघानी याचे 15 हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क पोलीस तपासात उघड झाले आहे. यामुळे जयसिंघानीच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Anil Jaisinghani : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटकेत असलेला बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याचं पंधरा हजार कोटींचे मॅचफिक्सिंग नेटवर्क उघडकीस आले आहे. हे नेटवर्क उघडकीस आल्याने अनिल जयसिंघानी याच्या अडचणीत आता आणखी भर पडणार आहे. त्याच्या या मॅच फिक्सिंग नेटवर्कमध्ये अनेक क्रिकेटपटू, आयपीएल फ्रँचाईसी (IPL), मालक आणि पोलिसांचा (Police) समावेश असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाला वेग दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने केला असल्याचा आरोप आहे. अमृता फडणवीस यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली. अनिक्षाने वडील जयसिंघानीवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी लाच देऊ केली असल्याचा आरोप आहे. अनिक्षाला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली.
अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू आहे. अनिल जयसिंघानीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर 15,000 कोटींचे मॅचफिक्सिंगचे मोठे नेटवर्क उघडकीस आले आहे. या रॅकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू, आयपीएल फ्रँचाईसी, मालक आणि पोलिसांचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे.
भ्रष्टाचार, ब्लॅकमेलिंग, मॅचफिक्सिंग आणि हवालाचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पाकिस्तान आणि दुबईतील क्रिकेट बेटिंग कार्टेलशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. एका दूरध्वनी संभाषणात जयसिंघानी रमेश या फरार बुकीला मुंबई आणि ठाण्यात क्रिकेट बेटिंग करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे समोर आले. या संभाषणात त्याने माझे स्वत:चे ठाणे आणि शिर्डी येथे थ्रीस्टार हॉटेल आहे. स्थानिक पोलिसांशी माझे चांगले संबंध आहेत आणि सुरक्षेसाठी दोन शस्त्रधारी गार्ड पण उपलब्ध करुन देतो असे त्याने संभाषणात म्हटले असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जयसिंघानीने या फोन कॉलमध्ये सनी हे कोडनाव वापरले आहे. आणखी एक बुकी किरण हा मेट्रो नावाने एक बेटिंग बुक चालवतोय. ही बेटिंग पोलिस संरक्षणात सुरू असल्याचेही त्याने संभाषणात म्हटले. या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज जयसिंघानीचाच असल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे. अनिल जयसिंघानी हा 5 राज्यांत 17 गुन्ह्यांमध्ये वाँटेड गुन्हेगार आहे.