Anti-Narcotics Task Force : महाराष्ट्रात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना, वाचा नेमका उद्देश काय?
Anti-Narcotics Task Force : महाराष्ट्र राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना (Anti-Narcotics Task Force) करण्यात आली आहे.
Anti-Narcotics Task Force : महाराष्ट्र राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना (Anti-Narcotics Task Force) करण्यात आली आहे. अवैध अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या सर्वांवर प्रभावी फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशानं टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलीय. पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापनेचा उद्देश काय?
अवैध अंमली पदार्थ यांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या सर्वांवर प्रभावी फौजदारी कारवाई करणे हा मुख्य उद्देश आहे.
अवैध अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय लागलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन करणे
अवैध अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे
अवैध अंमली पदार्थांच्या वाहतूक आणि वितरण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे
वरील सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा आणि राज्यस्तरीय यंत्रणा यामध्ये समन्वय ठेवणे
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची संरचना
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे प्रमुख हे विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. टास्क फोर्सचे मुख्यालय हे गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सध्याच्या मुख्यालयात असणार आहे. त्यांच्या अधिपत्याखाली पोलीस उप महानिरीक्षक दर्जाचे पद मुख्यालयात कार्यरत असणार आहे.
पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधीक्षक, प्रशासन, पोलीस अधीक्षक कृती पुणे विभाग आणि पोलीस अधीक्षक कृती नागपूर विभाग हे असतील. पोलीस अधीक्षक, (प्रशासन ) यांच्या अधिपत्याखाली अप्पर पोलीस अधीक्षक ( प्रशासन ) व पोलीस उप अधीक्षक ( प्रशासन ) हे कार्यरत असतील. पोलीस अधीक्षक, ( कृती ) पुणे विभाग यांच्या अधिपत्याखाली अप्पर पोलीस अधीक्षक, ( कृती ) व पोलीस उप अधीक्षक, ( कृती ) हे कार्यरत असतील.
पोलीस अधीक्षक, ( कृती ) नागपूर विभाग यांच्या अधिपत्याखाली अप्पर पोलीस अधीक्षक, (कृती ) आणि पोलीस उप अधीक्षक, ( कृती ) हे कार्यरत असतील. पोलीस अधीक्षक, (कृती ) नागपूर विभाग / अप्पर पोलीस अधीक्षक कृती नागपूर विभाग आणि पोलीस उप अधिक्षक, कृती नागपूर विभाग यांची कार्यालये नागपूर पोलीस आयुक्त कार्यालय येथे असतील. या व्यतिरिक्त इतर पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे कार्यरत असतील.
महत्त्वाच्या बातम्या: