एक्स्प्लोर

पॉर्न ॲप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्क फोर्स तर्फे झाडाझडती करा, आशिष शेलारांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात  कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात.

मुंबई : नुकत्याच अटक झालेल्या राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लील साईट आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणांचे शोषण आणि प्रचंड आर्थिक फसवणुकीची अनेक धक्कादायक माहिती उघड होते आहे. त्यामुळे या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे 1 अश्लील अ‍ॅप सब्स्क्राईब रेव्हेन्यू म्हणून दरमहा 20 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येतो आहे.  होतकरू तरुण तरुणींचे शोषण करून दबाव आणून हे व्हिडीओ तयार केली गेली होती. अशा 40 हून अधिक बेकायदेशीर अश्लील अॅप्स आणि वेबसाईट्स सदस्यत्वातून शेकडो कोटींची कमाई करतात. या सगळ्यातून तरुण पिढीवर, किशोरवयीन मुलांवर विपरित परिणाम होत असून नकारात्मकतेने घेरले आहे. चाईल्ड पॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत 2019 पासून 15,000 पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड केल्या गेल्या आणि 213 एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. सन 2017 पासून 2019 पर्यंत पॉस्को प्रकरणात 45 टक्के वाढ झाली आहे. ही अत्यंत बाब चिंताजनक आहे.
 
तर मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात  कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात. Balaji Telefilms, VOOT, MX Player, Ullu, Kooku, DesiFlix, Hot Shots, Primeflix, GupChup, Flizmov ही त्यातील आघाडीची नावे घेतली जात आहेत. म्हणून सीबीआय, ईडी, आय अँड बी, आयटी मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि एमसीएची एक संयुक्त टास्कफोर्स तयार करुन अशा सर्व अश्लील ओटीटी ॲप्स आणि वेबसाईट्सची झाडाझडती घेण्यात यावी.

तसेच  पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी आणि अशी सर्व ॲप्ससाठी कठोर नियमावली  आयटी मंत्रालयाला विकसित करण्याचे निर्देश देण्यात यावेत. नागरिकांना अशी सर्व प्रकरणांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी केंद्रीय पातळीवर पॉर्न आणि चाइल्ड पॉर्न हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. त्याबाबत माहिती वेळोवेळी सोशल मीडिया हँडल देण्यात यावे. तसेच सर्व ओटीटी वरील फिल्म, वेबसीरिज  सेन्सॉर बोर्डाच्या नियमात आणण्याबाबत विचार करण्यात यावा,  गंभीर बाब म्हणजे ड्रग्ज माफिया आणि या अश्लीलतेचा व्यापार करणाऱ्या माफियांचे साटेलोटे असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे त्याचाही कसून तपास करण्यात यावा,अशा मागण्या आमदार आशिष शेलार यांनी केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच; ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
मोशी दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच; ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget