शिंदे सरकारच्या काळात 15 हजार नवीन खासगी शाळांना परवानगी, दीपक केसरकर यांची माहिती
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे सररकारमध्ये 15 हजार नवीन खासगी शाळांना परवानगी देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे सररकारमध्ये 15 हजार नवीन खासगी शाळांना परवानगी देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, संस्थाचालकांनी शिक्षक भरती करताना शिक्षकांपासून कोणतीही माहिती लपवून ठेवू नये, असेही शिक्षणमंत्र्यांनी बजावलं आहे.
दीपक केसरकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, 'शाळा चालवणा-या खाजगी संस्थांवर आम्ही फार नियंत्रण ठेवत नाही. कारण आमचे खालचे अधिकारी तुम्हाला त्रास देतील. पण याचा असा अर्थ नाही की तुम्ही काहीच निर्बंध पाळायचे नाहीत. विद्यार्थ्यांची फी आली नाही म्हणून त्या मुलाचा दाखला आडवतात किंवा त्याला बसमध्ये प्रवेश देत नाहीत. हे टाळलं पाहिजे. आमच्या काळात आम्ही 15 हजार नवीन शाळांना परवानगी दिली आहे. तुमच्या सगळ्या अडचणी आम्ही मान्य करतो. पण तुम्ही तुमच्या शिक्षकांना खरं सांगा की सरकारी नोकरी मिळणार नाही. विनाअनुदानित असणार आहे.'
शिंदे सरकारच्या काळात 15 हजार खाजगी शाळांना परवानगी देण्यात आली आहे. या शाळा कायम विनाअनुदानित म्हणजे स्वयंअर्थसहायीत असतील. शिक्षकभरती करताना ही माहिती संस्थाचालकांनी शिक्षकांपासून लपवून ठेवू नका असं शिक्षणमंत्र्यांकडून बजावण्यात आलं आहे. मागच्या वेळी 190 प्रमाणपत्रे दिली आज 255 शाळांना परवानगी दिली. शाळा परवानगी देण्यासाठी लुट होत होती ही परवानगी ॲानलाईन मिळेल, असेही केसरकर म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या आरोपाबद्दल बोलताना केसरकर म्हणाले की, सहानुभूती आणि प्रसिद्धीसाठी आदित्य ठाकरे आरोप करत आहेत. इंडस्ट्रीतील लोकांना हे सोई सुविधा देण्यात सक्षम नव्हते. पर्यटकांसाठी ह्यांनी काय काम केले? पैसे कामात वापरले नाहीतय अडीच वर्षांत मिटींग घेतल्या नाहीत. लोक नाराज झाले, तुम्ही खोके बोलतात एकनाथ शिंदे यांच्या घरून आम्हाला डबे यायचे. तुम्ही कधी असे वागला नाहीत. बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. तुम्ही काँग्रेसला चांगलं बोलतात, लालुच कौतुक करतात आणि अयोध्या दौरा करून काय दाखवलं? असे दीपक केसरकर म्हणाले.
यांच्याकडे बोलायला बाहेरून लोक मागवावी लागतात. मागच्या वेळी भाजपच्या उपमुख्यमंत्री पदाच्या ॲाफर तुम्ही का स्विकारली नाही? महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही एकत्र अनेक वर्षे होतात, मग एकदाही महापौरपदी भाजपा का नव्हती? असा सवालही यावेळी दीपक केसरकर यांनी विचारला.
ही बातमी देखील वाचा