एक्स्प्लोर

छ. संभाजीनगरात थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणाच्या पथकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar: याप्रकरणी विद्युत सहायकांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसात मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar District) सिल्लोडच्या वाघदावाडीत एक धक्कादायक घटना समोर आली असून, थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणाच्या (Mahavitaran) पथकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (3 मार्च) रोजी दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर याप्रकरणी विद्युत सहायक यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसात मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गोवर्धन बैरागी (वय 24 वर्ष असे मारहाण झालेल्या विद्युत सहायकाचे नाव असून, रामसिंग सरदारसिंग महेर (रा.वाघदावाडी ता. सिल्लोड)  असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून मोहीम राबवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात अशाप्रकारे महावितरण विभागाचे पथक मोहीम राबवत वीजबिल वसुली करत आहे. दरम्यान सिल्लोड तालुक्यात देखील अशाचप्रकारे मोहीम राबवली जात आहे. मात्र काही ठिकाणी या मोहिमेला विरोध होताना देखील पाहायला मिळत आहे. तर अशीच काही घटना सिल्लोड तालुक्यातील वाघदावाडी येथे समोर आली आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला मारहाण याठिकाणी चक्क मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  

नेमकं काय घडलं! 

सिल्लोडच्या भराडी सर्कलचे विद्युत सहायक विशाल गोवर्धन बैरागी यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, आम्ही वसुली पथक सोबत वाघदावाडी येथे गेलो होतो. यावेळी गावातील रामसिंग यांना थकीत वीज बिल का भरले नाही याबाबत विचारणा केली. तर याचाच राग आल्याने रामसिंगने महावितरणाच्या पथकाला शिविगाळ करून दगड फेकून मारला. यावरून रामसिंग सरदारसिंग महेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास फौजदार विकास आडे हे करत आहे.

व्हिडीओ व्हायरल! 

दरम्यान महावितरणाच्या पथकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यात  रामसिंग हातात दगड घेऊन महावितरण पथकाच्या अंगावर धावून जात आहे. तसेच त्यांना शिवीगाळ देखील करत आहे. यावेळी महावितरणचे कर्मचारी आणि इतर लोकं वाद सोडवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. मात्र रामसिंग कुणाचेही आयकत नसून, पथकाला मारहाण करण्यासाठी अंगावर जात असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तर त्याचे कुटुंबातील सदस्य देखील त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो कोणाचेही आयकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे अखेर या प्रकरणी महावितरणच्या पथकाने पोलिसात धाव घेत, गुन्हा दाखल केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhajinagar: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, छ. संभाजीनगरमध्ये 400 लिटर दारुचं रसायन जप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget