धक्कादायक व्हिडिओ! तरुणांचा एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा स्टंट; औरंगाबादमधील संतापजनक प्रकार
Aurangabad News: या घटनेचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
![धक्कादायक व्हिडिओ! तरुणांचा एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा स्टंट; औरंगाबादमधील संतापजनक प्रकार maharashtra News Aurangabad News Stunt of youth throwing firecrackers at each other Outrageous type in Aurangabad धक्कादायक व्हिडिओ! तरुणांचा एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा स्टंट; औरंगाबादमधील संतापजनक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/25/224db4d9196773f85386a1ae19e984ab166667535356789_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News: सोमवारी देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. तर लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने फटाके (firecrackers) फोडून आतिषबाजी करण्यात आल्याचे चित्र सर्वत्र पाहायाला मिळाले. दरम्यान औरंगाबादमध्ये काही तरुणांनी चक्क एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा स्टंट केल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या खामगांव येथे मुलांच्या तीन वेगवेगळ्या गटात तुफान 'फटाके बाजी' पाहायला मिळाली. ज्यात ही मुलं फटाके एकमेकांच्या अंगावर फेकताना पाहायला मिळाली. याचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरातील खामगांव येथे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. दरम्यान यावेळी काही तरुणांनी मात्र वेगळ्याच पद्धतीने दिवाळी साजरी केली. कारण यावेळी चक्क एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्यात आले. एकाचवेळी तरुणाचे तीन वेगवेगळे गट आमने-सामने आले. फटाके पेटवून एकमेकांच्या अंगावर फेकण्याची जणू त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती. विशेष म्हणजे या सर्व घटनेचे काहीजण मोबाईलमध्ये व्हिडिओ सुद्धा तयार करत होते.
धक्कादायक व्हिडिओ! तरुणांचा एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा स्टंट; औरंगाबादमधील संतापजनक प्रकार pic.twitter.com/G7xwwOEmX5
— ABP माझा (@abpmajhatv) October 25, 2022
पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर...
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडत होता, त्यापासून हाकेच्या अंतरावर वडोद बाजार पोलीस ठाणे आहे. मात्र असे असताना देखील या तरुणांमध्ये कोणतेही भीती पाहायला मिळाली नाही. अखेर काही स्थानिक पत्रकारांनी याबाबतची माहिती पोलीस-पत्रकारांच्या ग्रुपवर टाकली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांची गाडी येताच तरुणांनी धूम ठोकली. त्यामुळे पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
फटाके फोडताना 16 जण भाजले...
औरंगाबाद शहर आणि परिसरात दिवाळीचे फटाके फोडताना 16 जणांना इजा झाली असल्याचे समोर आले आहे. ज्यात काही मुलांचा देखील समावेश आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात सद्या 6 रुग्णांवर उपचार सुरु आहे. ज्यात शहरातील मिसरवाडी भागातील 10 वर्षाच्या मुलाच्या चेहरा आणि डोळ्याला फटाके फोडताना इजा झाली आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे फटाके फोडताना मुलांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Aurangabad: फटाके फोडताना 16 मुलांच्या चेहऱ्याला, डोळ्यांना इजा; जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)