(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या काम बंद आंदोलन; 10 हजार डॉक्टरांचा संपात सहभाग
Doctor Protest: त्यामुळे उद्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमंडण्याची शक्यता असून, रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येणार आहे.
Doctor Protest: राज्यभरातील वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयातील (Government Hospital) समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी 1 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान उद्या राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer) मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहे. यावेळी राज्यभरातील 10 हजार समुदाय आरोग्य अधिकारी या काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे उद्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमंडण्याची शक्यता असून, रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येणार आहे.
शासकीय रुग्णालयातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रशासनाला निवदेन दिले आहे. सोबतच यापूर्वी देखील अनेकदा आंदोलनं देखील केली आहेत. मात्र तरीही आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. तर उद्या 1 फेब्रुवारी रोजी राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहे. त्यामुळे आता याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची मागणी!
- समुदाय आरोग्य अधिकारी यांना सेवेत कायम करून गट "ब" दर्जा देण्यात यावा
- सन 2017 पासून आमच्या हक्काचे 5% वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस मिळावे.
- समुदाय आरोग्य अधिकारी यांना सेवेत कायम करून गट "ब" दर्जा देण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत, निश्चित वेतन व कामावर आधारित वेतन यांचे प्रमाण बदलून निश्चित वेतन रू.25000/- (62.5%) वरून रू.36000/- (90%) व कामावर आधारित वेतन रू.15000 (37.5%) वरून रु.4000 (10%) एवढे करावे
- समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात धोरण निश्चित करण्यात यावे.
- सध्याचे 23 इंडिकेटरचे कामावर आधारित मोबदला चे format रद्द करून केंद्राने सुचविल्याप्रमाणे 15 इंडिकेटर अमलात आणावे आणि तोपर्यंत प्रति इंडिकेटर एक हजार रुपये देण्यात यावे
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पदोन्नती बढती मिळावे.
- समुदाय आरोग्य अधिकारी यांना TA-DA मिळावे
- समुदाय आरोग्य अधिकारी यांना भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळावे
- हार्ड एरिया अलाऊंस देण्यात येणाऱ्या क्षेत्राच्या यादीत शासन निर्णयानुसार समाविष्ट क्षेत्राचा अंतर्भाव करण्यात यावे आणि तो कामावर आधारित नाही तर सरसकट द्यावा.
- एस फॉर्म भरण्याची तांत्रिक जबाबदारी हे समूदाय आरोग्य अधिकारी यांचे नसून सुद्धा आमच्यावर सक्ती करत आहे. त्यामुळे मा. संचालक- 02 यांनी काढलेले पत्र त्वरित रद्द करावे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )