Imtiaz Jaleel: गूगल मॅपने 'संभाजीनगर'चा उल्लेख करताच जलील संतापले; म्हणाले...
Imtiaz Jaleel: गुगलने शहराचे नाव कशाच्या आधारे बदलले असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला आहे
Aurangabad News: गुगुल मॅपवर (Google Map) औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' तर उस्मानाबाद जिल्ह्याचे 'धाराशिव' असा उल्लेख करण्यात आल्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. केंद्र सरकराने अंतिम निर्णय घेतला नसतांनाही गुगुल मॅपवर झालेला बदल पाहता, आता त्याला विरोध होण्यास सुरवात झाली आहे. एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत, गुगलने शहराचे नाव कशाच्या आधारे बदलले असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काय म्हणाले जलील...
जलील यांनी गुगलला टॅग करत केलेल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, औरंगाबाद शहराचे नाव गुगलने कशाच्या आधारावर बदलले आहे हे तुम्ही स्पष्ट करू शकता का?, तसेच ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा खोडसाळपणा करण्यात आला आहे, त्याचं गुगलने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जलील यांनी केली आहे.
Can @Google please explain on what basis have you changed the name of my city Aurangabad in your map! You owe an explanation to the millions of citizens with whom this mischief has been played. pic.twitter.com/yB2r2VFjlz
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) July 19, 2022
काय बदल झाला आहे...
गुगुल मॅपवर औरंगाबाद किंवा उस्मानाबाद टाईपं केल्यावर इंग्रजीत 'संभाजीनगर' (Sambhaji Nagar) आणि धाराशिव (Dharashiv) असा उल्लेख दाखवत आहे. गुगलने हा बदल केल्याने ज्या-ज्या सोशल वेबसाईट गुगल मॅपवरून ऑटो लोकेशन पर्याय देतात त्यांना सुद्धा आता संभाजीनगरच दिसणार आहे. त्यामुळे हा मोठा बदला समजला जात आहे. तर यावरून आता सोशल मीडियावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. समर्थन आणि विरोधात अशा दोन्ही बाजूने पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जात आहे.
औरंगाबादचाही उल्लेख संभाजीनगर
ज्याप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचा गूगल मॅपवर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे उस्मानाबादचा उल्लेख सुद्धा धाराशिव करण्यात आला आहे. राज्यात नामांतरावरून सुरु असलेल्या घडामोडी पाहता गूगल मॅपवर दोन्ही जिल्ह्याचे अचानक नाव बदल्याने याची सोशल मीडियावर चर्चा आहे. तर अनेकजणांनी गुगलला मेल पाठवत नाव कशाच्या आधारे बदलण्यात आला आहे, याचा खुलासा मागितला आहे. तसेच लवकर यात बदल न झाल्यास गुगलला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा दावा सुद्धा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या...
Exclusive: गूगल मॅपकडून औरंगाबादचं 'संभाजीनगर' नामांतर
Exclusive: गूगल मॅपकडून संभाजीनगरबरोबरच उस्मानाबादचाही 'धाराशिव' उल्लेख