एक्स्प्लोर

ABP Majha Impact: 'माझा'च्या बातमीनंतर औरंगाबादच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महाराष्ट्रातून मदतीचा हात

Aurangabad: कालपासून चव्हाण कुटुंबातील सदस्यांना राज्यभरातून मदत मिळत आहे.

Aurangabad News: मराठवाड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकरी हतबल झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील अशाच एका बुट्टेवडगाव गावातील चव्हाण कुटुंबातील व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवली होती. माझाच्या या बातमीनंतर औरंगाबादच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महाराष्ट्रातून मदतीचा हात मिळत असून, त्यांची दिवाळी गोड झाली आहे. कालपासून चव्हाण कुटुंबातील सदस्यांना राज्यभरातून मदत मिळत आहे. 

औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव परिसरात ढगफुटीसुदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतात गेल्या चार दिवसांपासून पाणी तुंबले आहे. पीक पाण्याखाली गेल्याने दिसेनाशी झाली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. दरम्यान 'एबीपी माझा'ने  बुट्टेवडगावातील शेतकऱ्यांच्या व्यथा महाराष्ट्राला दाखवल्या होत्या. ज्यात ऋषिकेश चव्हाण नावाच्या चिमुकल्याने आपल्याकडे पैसे नसल्याने दिवाळीसाठी कपडे घेता येणार नसल्याची व्यथा बोलावून दाखवली होती. एबीपी माझाची ही बातमी महाराष्ट्रभरात व्हायरल झाली आणि चव्हाण कुटुंबाच्या मदतीला अनेक हात धावून आले आहे. 

ऋषिकेश डोळ्यात पाणी...

शेतातील नुकसान वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहता यावर्षी दिवाळी साजरी होणार नसल्याचे  ऋषिकेशला वाटले होते. त्यामुळे आपण कपड्यांचा हट्ट केला नसल्याचं ऋषिकेश म्हणाला होता. मात्र माझाच्या बातमीनंतर कालपासून चव्हाण कुटुंबाला राज्यभरातून मदत मिळत आहे. आज जेव्हा 'एबीपी माझा'ची टीम ऋषिकेशच्या घरी गेली तेव्हा बोलतांना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात देखील पाणी आले.

Abdul Sattar : सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही, वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश, कृषीमंत्र्यांची माहिती

'एबीपी माझा'चं आवाहन...

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला असून, त्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्यातील गावागावात अनेक ऋषिकेश असून, त्यांना देखील मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही आपली दिवाळी साजरी करतानाच शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन 'एबीपी माझा'च्या वतीने करण्यात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
Suhas Kande : शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोलGiriraj Sawant On Rushiraj Sawant : भावाचा बाहेर जातोय असा मेसेज,ऋषिराज सावंतांचे मोठे बंधू 'माझा'वरCotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 11 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
Suhas Kande : शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
Eknath Shinde : रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Raigad News: अजितदादा-अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली? शिंदे गटाचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
अजितदादा-अदिती तटकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना अंधारात ठेवलं, रायगडचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
Raigad DPDC meeting: शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले....
शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Embed widget