(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease: धक्कादायक! औरंगाबाद, बीड, परभणीसह जालन्यात लम्पीमुळे साडेतीन हजार जनावरांचा बळी
Lumpy Skin Disease: चार जिल्ह्यांतील 1499 गावे बाधित असून 52 हजार 531 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे
Lumpy Skin Disease: राज्यातील लम्पीची (Lumpy) परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा सतत प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad), बीड (Beed), परभणीसह (Parbhani) जालन्यातील (Jalna) लम्पीबाबत समोर आलेल्या आकडेवारीने खळबळ उडाली आहे. कारण या चार जिल्ह्यांतील 1 हजार 499 गावे बाधित झाली असून, 52 हजार 531 जनावरांना लम्पी आजाराची लागण (Lumpy Skin Disease) झाली आहे. धक्कादायक म्हणजे 3 हजार 672 जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
राजस्थानसह देशातील अनेक राज्यात थैमान घालणाऱ्या लम्पीचा प्रादुर्भाव मराठवाड्यात देखील पाहायला मिळाला. त्यामुळे हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम राबवली. मात्र आता लसीकरण केल्यानंतर देखील जनावरांना लम्पीचा लागण होतांना दिसत आहे. तर औरंगाबाद, बीड, परभणी व जालना या जिल्ह्यांमध्ये लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. या चार जिल्ह्यातील 1 हजार 499 गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराने जनावरे बाधित झाली आहेत. तर 52 हजार 531 जनावरे सध्या बाधित आहेत. विशेष म्हणजे यामध्ये गाय, बैल, वासरे यांचा समावेश आहे.
चार जिल्ह्यातील 1 हजार 499 गावांमध्ये 17 लाख 76 हजार 737 जनावरांना पशसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र असे असतांना देखील सद्यस्थितीत लम्पी स्कीन या आजाराने या चार जिल्ह्यात 3 हजार 672 जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे लम्पी स्कीन आजाराने चार जिल्ह्यात डोकेवर काढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेष म्हणजे 1 हजार 366 जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने 3 कोटी 31 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
लम्पी आजाराची स्थिती (औरंगाबाद, बीड, परभणी,जालना)
एकूण गोवंशीय प्राणी | 17 लाख 56 हजार 776 |
एकूण बाधित प्राणी | 52 हजार 531 |
एकूण बाधित गावे | 1 हजार 499 |
मृत्युमुखी पडलेली जनावरे | 3 हजार 672 |
प्राप्त एकूण लस | 18 लाख 31 हजार 400 |
एकूण लसीकरण | 17 लाख 76 हजार 736 |
अर्थसाहाय्य | 3 कोटी 31 लाख 86 हजार |
अदा अर्थसाहाय्य | 1 हजार 366 |
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sangli News : सांगलीत गोवर रुबेलाचा शिरकाव; महापालिकेकडून प्रतिबंधक उपाययोजनांसाठी 9 पथकं