एक्स्प्लोर

Aurangabad: हाताला काम मिळेना, त्यात दारूचे वांदे; जीव देण्यासाठी तरुण थेट पोहचला रुळावर

Aurangabad News: स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तरुणाचा जीव वाचला आहे. 

Aurangabad News: दारूच्या अतिव्यसनाने एखांद्याचे कुटुंब उध्वस्त केल्याच्या बातम्या (News) अधूनमधून समोर येतच असताच. तर याच दारूच्या नशेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना देखील अनेकदा घडत असतात. मात्र औरंगाबादमध्ये बेरोजगारीने हैराण झालेल्या एका 32 वर्षीय तरुणाचे दारूसाठी वांदे होत असल्याने त्याने थेट रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला आहे. 

याबाबत तरुणाचे जीव वाचवणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गाव सोडून शहरात आलेल्या शरदने (नाव बदलले आहे) केश कर्तनालयचा (Hair Salon) व्यवसाय सुरु केला होता. कष्टकरी असल्याने शरदच्या  व्यवसाय जोमात सुरू होता. परंतु याच काळात त्याला दारूचे व्यसन लगले. पाहता-पाहता शरद दारूच्या एवढ्या आहारी गेला की, परीणाम त्याच्या व्यवसायावर होऊ लागला. पुढे हे प्रमाण वाढले आणि व्यवसाय बंद पडला. दारूसाठी ओळखीच्या लोकांकडून उधारीने पैसे घेण्याची वेळ आली. अशात घराकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने पत्नीसोबत वाद होऊ लागले. त्यातच उसणे पैसे व काम मिळत नसल्याचे दारूचे वांदे होऊ लागले. त्यामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला.

आत्महत्या करण्यापासून रोखले

दारूसाठी पैसे मिळत नाही, त्यात कुठे हाताला कामही मिळत नसल्याने शरद शनिवारी सकाळी संग्रामनगर उड्डाण पुलाजवळील रेल्वे रुळावर (Railway Track) आत्महत्या करण्याच्या विचाराने पोहचला. मनाची पूर्ण तयारी करून शरद गाडीची वाट पाहत होता. याचवेळी ही बाबा स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या श्रीमंत गोर्डे पाटील यांच्यासह इतर नागरिकांनी शरदला रेल्वे पटरीवरून बाजूला करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. 

पत्नी घरगुती काम करून संसाराचा गाडा ओढतेय...

यावेळी नागरिकांनी शरदला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता, त्याला एक सहा वर्षांची मुलगी असून त्याची पत्नी घरगुती काम करून संसाराचा गाडा ओढत आहे. त्यात शरदला कुठेही काम मिळत नसून, दारूच्या व्यसनी गेल्याने मानसिक तणाव वाढला आहे. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचा तो म्हणाला. यावेळी गोर्डे यांच्यासह उपस्थित असल्याने नागरिकांनी त्याला काम देण्याचे आश्वासन देत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. तर यावेळी त्यानेही दारू न पिण्याची शपथ घेत मिळेल तो व्यवसाय करून कुटुंबाला आधार देण्याचा निश्चय केला आहे. 

Video Reels: व्हिडिओ रीलवरून झालेल्या वादातून तरुणांचा मैत्रिणीच्या आईच्या गळ्यावर थेट ब्लेडने वार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाबZero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तरZero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?Zero Hour Full : दानवेंचं निलंबन, ठाकरे-फडणवीसांची भेट ते मोदींचं भाषण; दिवसभरात काय घडलं? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget