(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: अपघातात जखमी झालेल्या महिला वारकऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा रुग्णालयात फोन; उपचाराचा खर्चही उचलला
Eknath Shinde: अपघातात जखमी झालेल्या महिलेवर ताबडतोब उपचार सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांना दिल्या.
Aurangabad News: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळताच कामाचा धडाका लावला आहे. त्यांच्या याच कामाचा आणखी एक उदाहरण समोर आला आहे. औरंगाबाद येथील एका महिला वारकऱ्याचा पंढरपूर येथून परतताना अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या महिला वारकऱ्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याने चांगल्या रुग्णालयात दाखल करता येत नव्हते. मात्र याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महिला रुग्णावर शहरातील मोठ्या रुग्णालयात उपचार करण्याच्या सूचना देत उपचाराचा खर्च स्वतः उचलणार असल्याच डॉक्टरांना सांगितले. एवढच नाही तर त्या महिला वारकऱ्याशी व्हिडिओ कॉलवरून संभाषण करत काळजी घेण्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लाखेगाव येथील एक महिला पंढरपूर वारी करून परत येताना त्यांचा अपघात झाला. त्यामुळे त्यांना शहरातील सिग्मा हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. मात्र महिलेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सिग्मा सारख्या मोठ्या रुग्णालयात उपचार करणे परवडणारे नव्हते. त्यामुळे गावातील काही लोकांनी याची माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना दिली. पाटील यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना संपर्क केला व त्यांना शासनाकडून काही मदत होईल का अशी विचारणा केली.
थेट मुख्यमंत्र्यांचा फोन...
विनोद पाटील यांच्या फोननंतर अवघ्या काही मिनिटातच चिवटे यांचा परत फोन आला आणि मुख्यमंत्र्यांशी तात्काळ महिला रुग्ण व डॉक्टरांचं बोलण करून द्या असे ते म्हणाले. त्यांनतर एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांना सूचना करत, ताबडतोब रुग्णावर उपचार सुरू करा व गरज भासल्यास शस्त्रक्रिया ही करा अशा सूचना केल्या. तसेच लागणारा संपूर्ण खर्च मी स्वतः करेल, पण रुग्ण बरा झाला पाहीजे अशा सूचना दिल्या. सोबतच महिला रुग्णाशी बोलत त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करत काळजी घेण्याचे सांगितले.
संबंधित बातम्या...
Ashadhi Ekadashi 2022 : बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा माननाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
Gadchiroli Rain : पावसाचा कहर, नदी नाल्यांना पूर; मुख्यमंत्री शिंदे तातडीने गडचिरोली दौऱ्यावर