NCP Crisis: मंत्रिपदाची शपथ घेतलेले नऊजण, खा. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे राष्ट्रवादीतून निलंबन, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय बैठकीत ठराव

Maharashtra NCP Political Crisis LIVE : अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ. शरद पवार की, अजित पवार? कोणाची साथ द्यायची, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jul 2023 09:09 PM
Nitin Gadkari: सभागृहात कितीही आले तरी बसता येतं...पण मंत्रिमंडळाची क्षमता वाढवता येत नाही; नितीन गडकरींची टोलेबाजी
Maharashtra Politics Nitin Gadkari: वर्तमान राजकीय परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टोला लगावला आहे. Read More
NCP Crisis: मंत्रिपदाची शपथ घेतलेले नऊजण, खा. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे राष्ट्रवादीतून निलंबन, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय बैठकीत ठराव
Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादीचे सर्वाधिकार हे शरद पवारांना देण्यात आले असून त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं आहे.  Read More
Raj Thackeray: मनसेकडून ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव नाही, राज ठाकरेंची एबीपी माझाला माहिती
Maharashtra Political Crisis गेल्या आठवड्यात मनसेची बैठक झाली आणि त्यात काही नेत्यांनी ठाकरेंना साथ द्यावी, असा सूर लावला. Read More
Kartik Aaryan : कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री? नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Chandu Champion : कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Salaar Starcast Fees : प्रभासने 'सालार'साठी घेतलंय 'आदिपुरुष'पेक्षा जास्त मानधन; जाणून घ्या...
Salaar : प्रभासच्या 'सालार' या सिनेमाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Hasan Mushrif vs Samarjeetsinh Ghatge: मंत्री हसन मुश्रीफांवरील आरोपांचं काय? समरजितसिंह घाटगे म्हणतात, 'मी थोड्याच दिवसात..'
समरजितसिंह घाटगे कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले होते. त्यांनी आज कागलमध्ये मेळावा घेत भाजपसोबत राहणार असल्याचा निर्धार करत मुश्रीफांविरोधात पुन्हा दंड थोपटले आहेत. Read More
'सातव्या मजल्यावरून उडी मारू म्हणणारे भुमरे म्हणतात...' मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास एका मिनिटात राजीनामा देईल
Maharashtra Politics Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यास मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी एका मिनिटांचा सुद्धा विलंब लावणार नसल्याचे भुमरे म्हणाले. Read More
Shanaya Kapoor : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी संजय कपूरची लेक सज्ज; मोहनलालच्या 'वृषभ' सिनेमात शनाया कपूर झळकणार
Shanaya Kapoor Acting Debut : शनाया कपूर आता 'वृषभ' या सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. Read More
Gondia News: राबणाऱ्या बापाच्या घामाचं सोनं केलं, शिपायाची लेक झाली पीएसआय; एमपीएससी परीक्षेत गोंदियाची प्रियंका राज्यात तिसरी
गोंदिया शहराच्या फुलचूर भागात राहणाऱ्या प्रियंका बैस या तरुणीने वर्ष 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत स्पोर्ट कोट्यातून विदर्भात पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. Read More
Chandrayaan-3 : इस्त्रो नव्या मोहिमेसाठी सज्ज! रॉकेटसोबत जोडलं चांद्रयान-3, पुढील आठवड्यात होणार प्रक्षेपण
ISRO Moon Mission : इस्त्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील चांद्रयान-3 प्रक्षेपणासाठी लाँच व्हेइकल म्हणजेच रॉकेटशी जोडण्यात आलं आहे. 13 जुलै रोजी प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. Read More
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' सिनेमातलं गाजत असलेलं 'मंगळागौर' गाणं लिहिलंय अभिनेत्री आदिती द्रविडने; युट्यूबवर होतंय ट्रेंड
Aditi Dravid : 'बाईपण भारी देवा' या सिनेमातलं 'मंगळागौर' हे गाणं अभिनेत्री आदिती द्रविडने गायलं आहे. Read More
...तर 15 रुपये लीटर पेट्रोल मिळेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा दावा
Gadkari on Fuel : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलच्या वाढत्या करण्याबाबत मोठा दावा केला आहे. देशात पेट्रोलची किंमत 15 रुपये प्रतिलीटर होऊ शकते, असा दावा गडकरी यांनी केला आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या दुसऱ्या संसारातही भांडणतंटा; 'या' कारणाने आशुतोषचा राग अनावर
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषमध्ये वाद झालेला पाहायला मिळणार आहे. Read More
Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये भीषण अपघात! बस 80 फूट खोल दरीत कोसळली, 29 जणांचा मृत्यू
Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये बस 80 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण बस अपघातात 29 जणांचा दुर्दैवी मृत्यू असून 19 जण जखमी झाले आहेत. Read More
Dhule Acccidnt: आधी वडील गमावले; आता अपघातात भावाचा मृत्यू अन् आई सुद्धा गंभीर जखमी, चिमुकलीचे मन हेलावणारे हुंदके
Dhule Accident: अपघातात आपली जवळची माणसे गमावलेल्या लोकांनी घटनेनंतर एकच आक्रोश केला. मात्र या सगळ्यात एका चिमुकलीची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. Read More
Priyanka Chopra : "फक्त हिप्स आणि बुब्स..."; भारतीय सिनेसृष्टीबद्दलचं प्रियांका चोप्राचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
Priyanka Chopra : बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणाऱ्या प्रियांका चोप्राच्या वादग्रस्त वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Read More
Salaar Teaser Out : प्रभासच्या 'सालार'चा धमाकेदार टीझर आऊट; अल्पावधीतच मिळाले लाखो व्ह्युज
Salaar Teaser : प्रभासच्या बहुचर्चित 'सालार' या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Kedarnath Dham : केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये
Kedarnath Dham Viral Video : मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. Read More
Maharashtra Election Survey: महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष
Maharashtra Election Survey Result: टाईम्स नाऊ नवभारतनं एक सर्वेक्षण केलं आहे. आज लोकसभेची निवडणूक झाली, तर कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या सर्वेक्षणात केला आहे. Read More
RBI News: आता डेबिट-क्रेडिट कार्ड घेताना ग्राहकच कार्ड नेटवर्क निवडू शकणार; RBI कडून परिपत्रक जारी
Debit-Credit Card Update: ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवड करण्याचा पर्याय देणारा आदेश 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होईल, असं RBI नं सांगितलं आहे. Read More
Mararashtra NCP Crisis: 2024 मध्ये भाजपला का हवीये अजित पवारांची साथ? काय आहे निवडणुकीपूर्वीचा गेम प्लान?
Mararashtra Politics : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं मिळालेलं पाहायला मिळतंय. पण भाजपसाठी अजित पवारांची साथ किती महत्त्वाची? हे जाणून घेऊयात... Read More

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) बंडानंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे नक्की भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून (Shiv Sena) बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तशी नाराजी शिंदेंच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शिंदेंकडे व्यक्त केल्याचीही माहिती मिळत आहे. 


अजित पवारांच्या शपथविधीनंतर काल (सोमवार) शिंदे गटाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली. याच बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.  तसेच, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही शिंदे गटातील काही मंत्री नाराज आहेत. 


शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्र्यांसह उदय सामंत (Uday Samant), गुलाबराव पाटील (Gulab Patil), शंभूराज देसाई, शिंदे गटाचे नेते दादा भुसे, संदिपान भुमरे उपस्थित होते. प्रत्येकाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी एक छोटीशी बैठक झाली ज्यात त्यांनी विभागांच्या संभाव्य वाटपावर चर्चा केली. यासोबतच अजित पवार आणि त्यांच्या निष्ठावंतांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.


अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार राज्य मंत्रिमंडळात सामील झाले  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची भावना निर्माण झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपल्या मनातली खदखद एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवली. अजितदादा आणि राष्ट्रवादीचे आमदार राज्य सरकारमध्ये आल्यानं जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याचं समजत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.