...तर 15 रुपये लीटर पेट्रोल मिळेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा दावा
Gadkari on Fuel : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतीबाबत मोठा दिलासादायक दावा केला आहे. देशात पेट्रोलची किंमत 15 रुपये प्रतिलीटर होऊ शकते, असा दावा गडकरी यांनी केला आहे.
Nitin Gadkari on Petrol Price : सध्या वाढत्या महागाईमुळे (Inflation) जनता त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इंधनाच्या किंमतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देशात पेट्रोलचे दर 15 रुपये प्रतिलीटर होऊ शकतात, असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. राजस्थानमधील (Rajasthan) एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना त्यांनी हा मोठा दावा केला आहे. गडकरी यांनी म्हटलं आहे की, सध्या देशात 16 लाख कोटी रुपयांची इंधनाची आयात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा दावा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा इंधनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राजस्थानमधील महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन (Rajasthan Highway Project Inauguration) करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 60 टक्के इथेनॉल (Ethanol) आणि 40 टक्के वीज (Electricity) वापरल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 15 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. यामुळे देशातील इंधनाची आयातही कमी होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरता येऊ शकतो.
''...तर 15 रुपये लीटर पेट्रोल मिळेल''
नितीन गडकरी यांनी पुढे म्हटलं आहे की, 'शेतकरी आता केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाताही बनेल. ऑगस्ट महिन्यात टोयोटा (Toyota) कंपनीची वाहने लाँच करण्यात येणार आहेत. ही सर्व वाहने (Vehicles) शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालतील. 60 टक्के इथेनॉल (Ethenol) आणि 40 टक्के वीज, त्याची सरासरी पकडली तर पेट्रोलची किंमत 15 रुपये प्रतिलीटर होईल.
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल
नितीन गडकरी यांनी राजस्थानमधील प्रतापगढ येथे 5600 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केलं. गडकरी म्हणाले की, सरासरी 60 टक्के इथेनॉल (Ethanol) आणि 40 टक्के वीजेचा (Electricity) वापर केल्यास पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल आणि लोकांना त्याचा फायदा होईल. सध्या देशाला मोठ्या प्रमाणात इंधनाची आयात करावी लागत आहे.
भारतात इंधनाची आयात 16 लाख कोटी रुपयांची आहे. ही आयात कमी केल्यास हा पैसा परदेशात जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाईल. उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते आणि भारतात लाखो ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे आहे. त्यामुळे असं झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :