Kartik Aaryan : कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री? नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Chandu Champion : कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kartik Aaryan Film Chandu Champion Actress : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. दरम्यान त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या सिनेमाची घोषणा झाली आहे.
कार्तिकच्या 'चंदू चॅम्पियन' या सिनेमाची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. 'चंदू चॅम्पियन' या सिनेमात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'चंदू चॅम्पियन' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Chandu Champion Release Date)
'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कबीर खान (Kabir Khan) यांनी सांभाळली आहे. हा बहुचर्चित सिनेमा 14 जून 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांनी 'चंदू चॅम्पियन' या सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला विचारणा केली आहे. त्यामुळे आता कार्तिक आणि श्रद्धाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. श्रद्धा कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात कार्तिकची झलक पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
'चंदू चॅम्पियन' हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. या सिनेमात प्रेक्षकांना एक उत्तम स्पोर्ट्स ड्रामा पाहायला मिळणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना उत्कृष्ट वीएफएक्स पाहायला मिळणार आहेत. 'चंदू चॅम्पियन' या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे.
कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kartik Aaryan Upcoming Movies)
कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासह 'कॅप्टन इंडिया' आणि 'आशिकी 3' हे सिनेमेदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा 29 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. समीर विद्वांसने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून कार्तिक आणि कियारा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या