Shanaya Kapoor : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी संजय कपूरची लेक सज्ज; मोहनलालच्या 'वृषभ' सिनेमात शनाया कपूर झळकणार
Shanaya Kapoor Acting Debut : शनाया कपूर आता 'वृषभ' या सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
Shanaya Kapoor South Debut : बॉलिवूड अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) सध्या चर्चेत आहे. शनाया आता मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'वृषभ' या सिनेमाच्या माध्यमातून शनाया दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांच्या 'वृषभ' (Vrushabha) या सिनेमाच्या माध्यमातून शनाया आता दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे. 'वृषभ' या सिनेमाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. हा पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नंदा किशोर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. लवकरच हा पॅन इंडिया सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'वृषभ'मध्ये शनाया कपूर महत्त्वाच्या भूमिकेत
'वृषभ' या सिनेमात शनाया कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शनाया सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याने तिचे चाहते आनंदी झाले आहेत. 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, 'वृषभ' हा सिनेमा वडील-मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना वर्तमानासह भूतकाळातदेखील घेऊन जातो.
View this post on Instagram
'वृषभ' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Vrushabha Movie Details)
'वृषभ' सिनेमात शनायाची महत्त्वाची भूमिका असण्यासोबत या सिनेमात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन आणि नाट्य अशा दोन्ही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. मोहनलाल आणि शनायासह या सिनेमात कोणते कलाकार झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'वृषभ' बहुचर्चित सिनेमाची निर्मिती एकता कपूरने केली असून हा पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. एकता कपूर आणि मोहनलाल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा केली आहे. शनाया कपूर करण जोहरच्या 'बेधडक' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. पण आता करण जोहरच्या 'स्कू ढीला' या सिनेमात शनाया झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मोहनलाल आणि शनायाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. मोहनलालचा 'दृश्यम 3' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या