एक्स्प्लोर

Gondia News: राबणाऱ्या बापाच्या घामाचं सोनं केलं, शिपायाची लेक झाली पीएसआय; एमपीएससी परीक्षेत गोंदियाची प्रियंका राज्यात तिसरी

गोंदिया शहराच्या फुलचूर भागात राहणाऱ्या प्रियंका बैस या तरुणीने वर्ष 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत स्पोर्ट कोट्यातून विदर्भात पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

गोंदिया : गोंदियातील (Gondia News) प्रियंका बैस या तरुणीने 23 व्या वर्षी पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादीत करत तिनं विदर्भात पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.   कोरोनामुळे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल थांबवण्यात आला होता. मात्र हा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे.

गोंदिया शहराच्या फुलचूर भागात राहणाऱ्या प्रियंका बैस या तरुणीने वर्ष 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत स्पोर्ट कोट्यातून विदर्भात पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. कोरोनामुळे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएसस परीक्षेचा निकाल अडकवून ठेवण्यात आला होता. मात्र हा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे.

23 व्या वर्षी प्रियंकाने पोलिस होण्याचे स्वप्न केले पूर्ण

पण म्हणतात ना मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर यश मिळवता येते हेच सिद्ध करून दाखविले आहे. गोंदियातील प्रियंका बैस या तरुणीने पदवी पर्यंतचे शिक्षण गोंदियात घेत स्पर्धा परीक्षेकरता कुठलीही क्लास जॉईन न करता पुण्यातील एका वाचनालयात बसून तिने अभ्यास करत हे यश संपादन केले आहे. प्रियंकाचे वडील रामसिंग बैस हे देखील गोंदिया पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यामुळे प्रियंकाला लहानपणापासूनच वर्दीची नोकरी मिळावी हे स्वप्न तिने पहिले असून त्याची तयारी देखील प्रियंकाने वयाच्या 21 व्या वर्षी सुरु केली. 23 व्या वर्षी प्रियंकाने पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करत आपल्या आई वडिलांचे नाव मोठे केले आहे.

 तर आपल्या मुलीने देखील वडिलांच्या पाठोपाठ पोलीस खात्यात नोकरी मिळविल्याने प्रियंकाच्या आई वडिलाने देखील आनंद व्यक्त केला.  पोलीस खात्यात नोकरी करत असलेल्या पोलिस शिपायाची मुलीने  एमपीएससी परीक्षा पास करत पीएसआय होण्याचा मान मिळविला आहे 

सुनील कचकवाड हा राज्यात पहिला

संभाजीनगरमधील सुनील कचकवाड हा राज्यातून पहिला आला आहे. तर या निकालानंतर विद्यार्थ्यांनी ढोल ताशे वाजवत फटाके फोडत आनंद साजरा केला आहे. 2020 पासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. निकाल लागल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे एमपीएससीच्या 2020 मधील पीएसआय परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिला येणारा विद्यार्थी हा संभाजीनगर मधील आहे. 

हे ही वाचा :

स्वतःचं बलस्थान ओळखलं अन् दुसऱ्याच प्रयत्नात राज्यात दुसरा, कोल्हापूरच्या शुभम पाटीलची MPSC परीक्षेत कमाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget