एक्स्प्लोर

Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये भीषण अपघात! बस 80 फूट खोल दरीत कोसळली, 29 जणांचा मृत्यू

Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये बस 80 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण बस अपघातात 29 जणांचा दुर्दैवी मृत्यू असून 19 जण जखमी झाले आहेत.

Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये बस 80 फूट खोल दरीत कोसळून भीषण बस अपघात झाला आहे. या बस अपघातात 29 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, 19 जण जखमी झाले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी पहाटे दक्षिण मेक्सिकोमध्ये बस दरीत कोसळली. या अपघातात 29 लोक ठार आणि इतर 19 जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी हा भीषण अपघात झाला आहे. 

मेक्सिकोमध्ये भीषण बस अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. प्रांतीय वाहतूक पोलिसांनी ट्विट करत सांगितलं आहे की, बस मेक्सिको सिटीहून ओक्साका शहराकडे जात होती. मीडिया रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 29 लोकांचा मृत्यू झाला आणि 19 जखमींना उपचारांसाठी प्रदेशातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

बस 80 फूट खोल दरीत कोसळून 29 जणांचा मृत्यू

ओक्साकाच्या राज्यपाल सॉलोमन यांनी ट्विट करून अपघाताची माहिती दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रहिवासी आणि पालिका कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी बचावकार्यात मदत केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक वर्षाचं बालक, 13 महिलांचा समावेश आहे.

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची शक्यता

जीसस रोमेरो यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'स्थानिक वाहतूक कंपनीची बस मंगळवारी रात्री राजधानी मेक्सिको सिटी (Mexico City) येथून सॅंटियागो डी योसुंडुआ (Santiago De Yosondua)  शहराकडे निघाली होती. दुर्दैवाने ही बस 25 मीटर (80 फूट) खोल दरीत कोसळली. वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.'

राज्यपालांनी व्यक्त केलं दु:ख

ओक्साकाचे राज्यपाल सॉलोमन यांनी या भीषण अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. राज्यपालांनी विविध यंत्रणांना घटनास्थळी जाऊन पीडितांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनी प्रशासन, आरोग्य, सार्वजनिक सुरक्षा, कल्याण आणि इतर विभागांच्या सचिवांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. राज्यपालांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती, नवं अलिशान घरं ठरलं कारण? नर्तिका-उपसरपंच प्रेमप्रकरणाची 'डिमांड स्टोरी'
10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती, नवं अलिशान घरं ठरलं कारण? नर्तिका-उपसरपंच प्रेमप्रकरणाची 'डिमांड स्टोरी'
Mutual Fund : इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ऑगस्ट महिन्यात घटली, आकडेवारी समोर, गुंतवणूक तब्बल 22 टक्क्यांनी घटली
इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत घसरण, ऑगस्ट महिन्यात गुंतवणूक 22 टक्क्यांनी घटली
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार, निधी संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार, निधी संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती, नवं अलिशान घरं ठरलं कारण? नर्तिका-उपसरपंच प्रेमप्रकरणाची 'डिमांड स्टोरी'
10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती, नवं अलिशान घरं ठरलं कारण? नर्तिका-उपसरपंच प्रेमप्रकरणाची 'डिमांड स्टोरी'
Mutual Fund : इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ऑगस्ट महिन्यात घटली, आकडेवारी समोर, गुंतवणूक तब्बल 22 टक्क्यांनी घटली
इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत घसरण, ऑगस्ट महिन्यात गुंतवणूक 22 टक्क्यांनी घटली
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार, निधी संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार, निधी संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जारी
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; जरांगेची मागणी मान्य, कधीपर्यंतचे गुन्हे मागे घेणार?
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; जरांगेची मागणी मान्य, कधीपर्यंतचे गुन्हे मागे घेणार?
सरकारी नोकरीचे आमिष, थेट मंत्रालयात मुलाखती, बोगस आयकार्डही दिलं; ठगाला अटक, तरुणांच्या कोट्यवधींच्या फसवणुकीची व्याप्ती मोठी
सरकारी नोकरीचे आमिष, थेट मंत्रालयात मुलाखती, बोगस आयकार्डही दिलं; ठगाला अटक, तरुणांच्या कोट्यवधींच्या फसवणुकीची व्याप्ती मोठी
राज अन् उद्धव ठाकरेंच्या बैठकीतील 5 प्रमुख मुद्दे; शिवतीर्थवरील 'राज'कीय भेटीची इनसाईड स्टोरी
राज अन् उद्धव ठाकरेंच्या बैठकीतील 5 प्रमुख मुद्दे; शिवतीर्थवरील 'राज'कीय भेटीची इनसाईड स्टोरी
एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या; युपी, एमपी फिरला, नावही बदललं; टॅटूचा क्लू मिळताच पोलिसांनी धरला
एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या; युपी, एमपी फिरला, नावही बदललं; टॅटूचा क्लू मिळताच पोलिसांनी धरला
Embed widget