Beed News: धक्कादायक! एचआयव्ही बाधित मुलं शाळेत शिकतायत म्हणून ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; बीडमधील घटना

Maharashtra NCP Political Crisis LIVE : अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ. शरद पवार की, अजित पवार? कोणाची साथ द्यायची, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Jul 2023 08:52 PM
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरातून तडकाफडकी मुंबईला रवाना; चर्चांना उधाण
CM Eknath Shinde: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपुरात स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. Read More
Beed News: धक्कादायक! एचआयव्ही बाधित मुलं शाळेत शिकतायत म्हणून ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; बीडमधील घटना
Beed News : या घटनेनंतर एचआयव्ही बाधित मुलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शाळा भरवली. Read More
Maharashtra Politics: शिवसेना, राष्ट्रवादी आता काँग्रेसचा नंबर? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने खळबळ
Maharashtra Politics: सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय महानाट्यामध्ये काँग्रेसच्या चर्चांनी देखील आता जोर धरला आहे. तसेच काँग्रेस पक्ष देखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. Read More
Lohagad fort: लोहगडावर पर्यटकांची तोबा गर्दी; चार तास लोक महादरवाज्यात अडकले; व्हीडिओ व्हायरल
Lonavala: पावसाळा सुरू झाल्याने विकेंडला पर्यटनस्थळांवर कायम गर्दी असते, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी फिरायला जाताना खबरदारी घेतली पाहिजे. Read More
Sharad Pawar Or Ajit Pawar : पवार साहेब की अजित दादा! दोन्ही गटाकडून फोनाफोनी सुरू; कार्यकर्ते संभ्रमात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या गटासोबत राहायचं यावरुन चांगलीच गोची झाली आहे. पदाधिकाऱ्यांचा शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत थेट कनेक्ट आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास अवघड जातंय. Read More
Sangli News: गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाख रुपये दे...नाहीतर लग्न होऊन न देण्याची धमकी; नैराश्याच्या गर्तेत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
Sangli News: गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाखांची मागणी आणि लग्न जमू न देण्याच्या धमकीने नैराश्यात अडकलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचललं असल्याची घटना समोर आली आहे. Read More
Nashik NCP : नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वाद, शरद पवार समर्थकांकडून घोषणाबाजी, तर भुजबळ समर्थक कार्यालयात 
Nashik Political News : अखेर नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वादाला तोंड फुटले असून राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. Read More
छत्रपती संभाजीनगर शहरात पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई; पोलीस आयुक्तांनी काढले आदेश
Chhatrapati Sambhaji Nagar News : सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. 4 जुलै ते 18 जुलैपर्यंत हे आदेश लागू असणार आहे.  Read More
Nashik : सत्ता समीकरण बदललं, शासन आपल्या दारीची तारीखही बदलली, नाशिकचा कार्यक्रम पुढे ढकलला! 
Nashik News : सरकारचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला 'शासन आपल्या दारी' हा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. Read More
Telly Masala : प्रिया मराठेचा 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेला रामराम ते पत्र्याच्या झोपडीत बालपण गेलेल्या माधुरी पवारचा संघर्षमय प्रवास; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत. Read More
NCP Political Crisis: राष्ट्रवादीत कार्याध्यक्ष पदाची केवळ घोषणाच, पक्षाच्या घटनेत अद्याप नोंदच नाही!
10 जूनला ही घोषणा झाली त्यानंतर अवघ्या 20 दिवसांतच पक्षात दोन गट तयार झालेत. या दरम्यान घटनाबदलाची कुठलीच प्रक्रिया सुरुही झालेली नाही Read More
TDS vs TCS: टीसीएस आणि टीडीएस मध्ये फरक काय? ITR फाईल करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती
TDS vs TCS: टीडीएस आणि टीसीएसबाबत करदात्यांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. कर गोळा करण्याच्या या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. Read More
Iphone 15 Series: अ‍ॅपल कंपनी आयफोन 15 सीरिजचं उत्पादन वाढवणार; यंदा स्टॉक संपण्याची भीती नाही
Iphone 15: अ‍ॅपल आयफोन 15 येत्या काही महिन्यात लॉन्च होणार आहे. यासाठी कंपनीने झेंग्झूमध्ये चाचणी, उत्पादन सुरू केलं आहे. फॉक्सकॉन आणि अ‍ॅपल यंदा मोठ्या प्रमाणात आयफोन बनवणार आहे. Read More
विकृतपणा! 10 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीतील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी दोन विकृत तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Sharad Pawar NCP : ठरलं! लवकरच शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा; सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून, जयंत पाटीलांची माहिती 
Sharad Pawar Nashik : शरद पवार हे महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.  Read More
Madhuri Pawar : पत्र्याच्या झोपडीत बालपण गेलेल्या माधुरी पवारच्या स्वप्नातलं घर कसं आहे? जोडीदाराबद्दल म्हणाली,"गव्हाळ रंगाचा"
Madhuri Pawar : माधुरी पवारने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे. Read More
Pune Crime news : येरवड्यातील मनोरुग्णालयात चाललंय काय? भुलीचं इंजेक्शन देत अल्पवयीन मुलावर अत्याचार; एक्स-रे पाहून माय-बाप हादरले; नक्की काय घडलं?
येरवडा येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या 16 वर्षीय मुलावर कैद्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Read More
Nashik Politics : आम्ही अजित पवार, छगन भुजबळांसोबत; नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाचा ताबा 
Nashik Politics : नाशिकमध्ये (Nashik) अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. Read More
ETG Survey: आज निवडणुका घेतल्यास BJP, काँग्रेस, TMC, BJD आणि BRS ला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा निष्कर्ष
Lok Sabha Election 2024 Survey: आज निवडणुका घेतल्यास जनतेचं बहुमत कोणाला? कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष. Read More
गुरुजी तुम्ही पण! प्रवेशासाठी लाच घेणारे मुख्याध्यापक, लिपिक ACB च्या जाळ्यात; परभणीच्या नामांकित शाळेतील प्रकार
Parbhani Education News: लाच स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले. Read More
Maharashtra Cabinet Portfolio : राष्ट्रवादीचे मंत्री सीनियर, त्याप्रमाणे खाती हवी, विस्तारानंतर खातेवाटपावरुन तिढा?
Maharashtra Cabinet Portfolio :अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा असतानाच आता खाते वाटपावरुनही तिढा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Read More
Pune Crime News : दुबई विमानातून उतरली, पळ काढण्याच्या तयारी होती, पण...; पुणे विमानतळावरच महिलेकडून 20 लाखांचं सोनं जप्त
दुबईहून स्पाईसजेट फ्लाईटने पुण्यात आलेल्या (Pune Crime news ) एका महिला प्रवाशाकडून 20 लाख रुपयांचे 423 ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले आहे. Read More
Pravin Darekar BJP : शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला असताना, भाजप राष्ट्रवादीच्या संपर्कात; प्रवीण दरेकरांचा मोठा गौप्यस्फोट 
Pravin Darekar BJP : शिंदे गटाचे आमदार (shivsena) हे जेव्हा गुवाहाटीला गेले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते. Read More
साधेपणा... ना सरकारी गाडी, ना जंगी स्वागत; पदभार सोडल्यावर केंद्रेकर पत्नीसह पायीच निघाले
Sunil Kendrekar Retired : यावेळी त्यांनी कुठल्याही शासकीय गाडीचा वापर न करता साधेपणाने आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते शासकीय निवास्थान गाठले. Read More
Marathi Celebrities Joined Shivsena : राणादाचा जीव शिवसेनेत रंगला, अदिती सारंगधरच्या हातीही भगवा, आतापर्यंत कोण कोण शिंदेसेनेत...
Marathi Celebrities Shivsena Entry : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर आऊट; आलिया-रणवीरच्या सिझलिंग केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांचं मन
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया भट्ट आणि रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी अपडेट; अखेर राहुल हांडोरे...
दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हांडोरी याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर हंडोरे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. Read More
मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू
Mumbai Agra Highway Accident: ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यानं धुळे - मुंबई - आग्रा महामार्गावर भीषण अपघात.

12 जणांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता Read More
Marathwada Accident : अपघातांच्या मालिकेने मराठवाडा हादरला! पाच अपघातांमध्ये 9 जण ठार, तर 23 जखमी
Marathwada Accident News : यातील सर्व जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. यात काहींची प्रकृती गंभीर आहे.  Read More
Maharashtra Political Crisis : अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची दाट शक्यता

Mumbai News: अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होतेय. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी नेत्यांसह प्रभारी एच.के. पाटील उपस्थित राहणार आहेत. ज्याचं संख्याबळ जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी कसा समन्वय साधणार, याची सर्वानाच उत्सुकता आहे. 

Maharashtra Political Crisis : अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची दाट शक्यता

Mumbai News: अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होतेय. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी नेत्यांसह प्रभारी एच.के. पाटील उपस्थित राहणार आहेत. ज्याचं संख्याबळ जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी कसा समन्वय साधणार, याची सर्वानाच उत्सुकता आहे. 

Maharashtra NCP Political Crisis : मविआ सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांचं भाजपसोबत युतीसाठी शरद पवारांना पत्र : प्रफुल्ल पटेल

NCP Political Crisis : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी, भाजपसोबत युती करावी असं पत्र शरद पवारांना लिहिलं होतं, असा अतिशय खळबळजनक दावा पटेल यांनी केला आहे. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र राष्ट्रवादीचं नेतृत्व वेळेवर निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले आणि एकनाथ शिंदे यांनी संधी साधत भाजपसोबत सरकार स्थापन केलं, असं म्हणत पटेल यांनी पवारांवर थेट टीका केली आहे.  

Ahmednagar News : योगाच्या माध्यमातून अनोखा योग, चीनची तरुणी झाली ग्रामीण भागातील सून; संगमनेरमधील अनोख्या लग्नाची चर्चा
Ahmednagar News : योगाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर संगमनेर तालुक्यातील योग शिक्षक असलेल्या युवकाने चीनच्या युवतीशी लग्नगाठ बांधली आहे आणि चीनची मुलगी ग्रामीण भागाची सून झाली आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) बंडानंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे नक्की भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून (Shiv Sena) बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तशी नाराजी शिंदेंच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शिंदेंकडे व्यक्त केल्याचीही माहिती मिळत आहे. 


अजित पवारांच्या शपथविधीनंतर काल (सोमवार) शिंदे गटाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली. याच बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.  तसेच, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही शिंदे गटातील काही मंत्री नाराज आहेत. 


शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्र्यांसह उदय सामंत (Uday Samant), गुलाबराव पाटील (Gulab Patil), शंभूराज देसाई, शिंदे गटाचे नेते दादा भुसे, संदिपान भुमरे उपस्थित होते. प्रत्येकाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी एक छोटीशी बैठक झाली ज्यात त्यांनी विभागांच्या संभाव्य वाटपावर चर्चा केली. यासोबतच अजित पवार आणि त्यांच्या निष्ठावंतांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.


अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार राज्य मंत्रिमंडळात सामील झाले  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची भावना निर्माण झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपल्या मनातली खदखद एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवली. अजितदादा आणि राष्ट्रवादीचे आमदार राज्य सरकारमध्ये आल्यानं जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याचं समजत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.