Marathi Celebrities Joined Shivsena : राणादाचा जीव शिवसेनेत रंगला, अदिती सारंगधरच्या हातीही भगवा, आतापर्यंत कोण कोण शिंदेसेनेत...
Marathi Celebrities Shivsena Entry : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Marathi Celebrities Joined Eknath Shinde Shivsena : कलाकार आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. मनोरंजनसृष्टी आणि राजकारण यांचा थेट संबंध नसला तरी गेल्या काही दिवसांत मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या आवडत्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.
'या' कलाकारांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, राजेश भोसले, योगेश शिरसाट, अलका परब, शेखर फडके, केतन क्षीरसागर, हार्दिक जोशी, आदिती सारंगधर, माधव देवचके, अमोल नाईक, प्रतीक पाटील या कलाकारांचा समावेश आहे.
सुशांत शेलारने गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना राम-राम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिंदे गटातील चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी सुशांतची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राजेश भोसलेचे निवड करण्यात आली आहे. तसेच राजेश भोसले, शेखर फडके, केतन क्षिरसागर, भरत भानूशाली आणि शंतनु कुलकर्णी हे कलाकारही चित्रपट सेनेचं काम पाहत आहेत.
#गुरुपौर्णिमा या शुभदिनी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेता माधव देवचाके, अभिनेता अमोल नाईक, अभिनेता प्रतीक पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा… pic.twitter.com/Gx2dcKQseE
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 3, 2023
शर्मिष्ठा राऊत, राजेश भोसले, योगेश शिरसाट, अलका परब, शेखर फडके आणि केतन क्षीरसागर यांनी 28 मार्च 2023 रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता हार्दिक जोशी, आदिती सारंगधर, माधव देवचके, अमोल नाईक, प्रतीक पाटील या कलाकारांनीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
प्रेक्षकांसह कलाकारांसाठीही प्रामाणिकपणे काम करू : राणादा
एकनाश शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राणादा अर्थात हार्दिक जोशी म्हणाला,"कलाकार म्हणून आम्ही प्रेक्षकांसाठी काम करतच होतो. पण आता आम्ही प्रेक्षकांसह कलाकारांसाठीही प्रामाणिकपणे काम करू. चित्रपट सेनेच्या माध्यमातून आम्ही कलाकारांसाठी नक्कीच चांगले काम करू". तर आदिती सारंगधर म्हणाली,"आपल्या माणसांसाठी लढायची वेळ आली आहे".
शर्मिष्ठा राऊत म्हणाली,"नायक सिनेमा पाहिल्यामुळे स्वप्नातला मुख्यमंत्री म्हणजे अनिल कपूर वाटायचा. पण आज खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे आमचे नायक आहेत. खऱ्या अर्थाने एक उत्तम पालक आम्हाला लाभले आहेत. या पालकांच्या छत्रछायेखाली काम करायला आम्हाला नक्की आवडेल".
संबंधित बातम्या