एक्स्प्लोर

Sangli News: गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाख रुपये दे...नाहीतर लग्न होऊ न देण्याची धमकी; नैराश्याच्या गर्तेत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Sangli News: गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाखांची मागणी आणि लग्न जमू न देण्याच्या धमकीने नैराश्यात अडकलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचललं असल्याची घटना समोर आली आहे.

Sangli Crime News:  जातीवाचक शिवीगाळ केल्याचा दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची होत असलेली  मागणी आणि लग्नच जमू न देण्याची धमकी यामुळे नैराश्यात गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli) खानापूर तालुक्यातील (Khanapur) पोसेवाडी गावात घडली आहे. 
 
महेश सुभाष जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर महेशच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गावातील महिला, पुरुषांनी मोर्चा काढला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली (Police Arrested Accused) आहे. 

कुटुंबीयांनी काय म्हटले?

पोसेवाडी येथील महेश जाधवने आपल्या घराजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्देवी घटना घडली.. महेशचा एक भाऊ सुनील जाधव हा केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) जवान आहे. त्याच्यावर देखील गेल्या वर्षी पोलिसात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल होता. महेश याच्यावर राजकीय हेतू ठेवून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच अंकुश ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव यांच्यासह धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते, नितीन खुडे यांनी त्याला हा खटला न्यायालयातून काढून घेण्यासाठी पाच लाख रुपये दे, नाहीतर तुझे लग्न होणार नाही तसेच न्यायालयात तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यामुळे महेशने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. 

ग्रामस्थांचे आंदोलन 

महेशने आत्महत्या केल्यानंतर  ग्रामस्थांनी विटा पोलिस ठाण्यासमोर मृतदेह नेत संबंधितांवर गुन्हा आणि त्यांना तात्काळ अटक होत नाही, तोपर्यंत महेश याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता.  त्यानंतर पोलिसांनी सरपंच ठोंबरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.  

पोलिसांची कारवाई 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंच अंकुश नामदेव ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव, धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते आणि नितीन खुडे या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून यातील सरपंच अंकुश ठोंबरे याला पोलिसांनी अटक केली आहे.  या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
झोमॅटोवर केली ऑर्डर, पण घरी पोहोचलेच नाहीत 133 रुपयांचे मोमोज; आता ग्राहकाला मिळाले 60 हजार रुपये, काय घडलं?
झोमॅटोवर केली ऑर्डर, पण घरी पोहोचलेच नाहीत 133 रुपयांचे मोमोज; आता ग्राहकाला मिळाले 60 हजार रुपये, काय घडलं?
हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम
हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम
Ashadi Ekadashi Pandharpur Wari : वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे!  आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम
वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे! आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaShahu Maharaj PC Kolhapur | विशाळगडावरील तोडफोड म्हणजे षडयंत्र! शाहू महाराजांची प्रतिक्रियाShahu Maharaj At Vishal gad | विशाळगड परिसरातील नुकसानग्रस्तांना सरकारने भरपाई द्यावी- शाहू महाराजABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 16 July 2024 Marathi news

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
झोमॅटोवर केली ऑर्डर, पण घरी पोहोचलेच नाहीत 133 रुपयांचे मोमोज; आता ग्राहकाला मिळाले 60 हजार रुपये, काय घडलं?
झोमॅटोवर केली ऑर्डर, पण घरी पोहोचलेच नाहीत 133 रुपयांचे मोमोज; आता ग्राहकाला मिळाले 60 हजार रुपये, काय घडलं?
हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम
हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम
Ashadi Ekadashi Pandharpur Wari : वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे!  आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम
वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे! आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Amruta Khanvilkar Amey Wagh :  आपण शोधायचं का रोहित चौहानला? अमृता खानविलकर-अमेय वाघची हाक, काय आहे प्रकरण?
आपण शोधायचं का रोहित चौहानला? अमृता खानविलकर-अमेय वाघची हाक, काय आहे प्रकरण?
Rakul Preet Singh's Brother Aman Preet Singh Arrest :  अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
Emraan Hashmi : चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
Embed widget