एक्स्प्लोर

ETG Survey: आज निवडणुका घेतल्यास BJP, काँग्रेस, TMC, BJD आणि BRS ला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा निष्कर्ष

Lok Sabha Election 2024 Survey: आज निवडणुका घेतल्यास जनतेचं बहुमत कोणाला? कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष.

Lok Sabha Election 2024 Survey: पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) हळूहळू जवळ येत आहेत. सर्व राजकीय पक्ष त्याच्या तयारीला लागले आहेत. या सगळ्यात 2024 मध्ये देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक सर्वेक्षण समोर आलं आहे. जर आता लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या, तर जनतेला कोणाचं सरकार हवं आहे, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच, या सर्वेक्षणातून जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. 

टाईम्स नाऊ आणि ईटीजीनं हे सर्वेक्षण केलं आहे, ज्यामध्ये काही लोकांना आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता येतील? हा प्रश्न विचारण्यात आला. सर्वेक्षणातील निष्कर्षातून अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. जर सद्यस्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपच्या वाट्याला गेल्या लोकसभेपेक्षा कमी जागा येतील, पण केंद्रात मात्र भाजपलाच बहुमत मिळण्याची शक्यता आहे. 

सर्वेक्षणाच्या आकडेवारीत एनडीए आघाडीला 285-325 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी काँग्रेस आघाडीला 111-149 जागा मिळण्याची शक्यता आहे.

TMC, YSRCP आणि BJD ला किती जागा?

जर आपण इतर पक्षांबद्दल बोललो तर तृणमूल काँग्रेसला (TMC) 20-22 जागा मिळतील असा अंदाज आहे. बिहारमध्येही एनडीएला 22-24 जागा मिळतील, तर राष्ट्रीय जनता दल-जनता दल युनायटेड-काँग्रेस महाआघाडीला 16-18 जागा मिळतील.

या सर्वेक्षणात वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीला (YSRCP) 24-25 जागा मिळू शकतात आणि नवीन पटनायक यांच्या बीजेडीला (BJD) ओडिशात 12-14 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोणाला किती जागा?

सर्वेक्षणानुसार, मध्य प्रदेशात भाजप 22 ते 24 जागा जिंकू शकते. याशिवाय राजस्थानमध्ये 20 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर त्यांना केवळ 3 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊच्या मते, ईटीजीच्या या सर्वेक्षणात 1.35 लाख लोकांनी भाग घेतला. ज्यामध्ये 40 टक्के लोकांकडून घरोघरी जाऊन प्रतिक्रिया घेण्यात आल्या, तर 60 टक्के लोकांशी फोनवर बोलून त्यांचं मत जाणून घेण्यात आलं. 

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जिथे विरोधी पक्ष महाआघाडीसाठी प्रयत्नशील आहेत, याचसंदर्भात त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर आता पुढील बैठक बंगळुरूमध्ये होणार आहे. तसेच, सध्या सत्तेत असलेली भाजप सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्नात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
BaramatI News: बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले,
बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले, "तो चहा-नाष्ट्यासाठी दिलेला खर्च...", बारामतीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
FDA: आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
Devendra Fadnavis: Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
New Zealand vs India, 2nd T20I: 41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
Shrikant Shinde and Manoj Jarange patil: मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Onkar elephant Sindhudurg: ओंकार हत्ती गावात फिरतफिरत चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
ओंकार हत्ती गावात फिरतफिरत चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
Embed widget