एक्स्प्लोर

मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू

Mumbai Agra Highway Accident: ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यानं धुळे - मुंबई - आग्रा महामार्गावर भीषण अपघात. 12 जणांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Mumbai Agra Highway Accident: धुळे - मुंबई - आग्रा महामार्गावर (Dhule-Mumbai-Agra Highway) पळासनेर (Palasner) गावाजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात आधी पाच जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. या अपघातात आता मृतांची संख्या वाढली असून आता मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. अपघात काहीजण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. 

कंटनर हॉटेलमध्ये शिरल्यानं अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Devendra Fadnavis Profile : बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री...  घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 05 December 2024Eknath Shinde Oath Ceremony Update : एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्र देण्यासाठी राजभवनवर जाणारUday Samant PC Mumbaiएकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर मंत्रिपद स्वीकारणार नाही-सामंतChampasingh Thapa on Eknath Shinde : शपथविधीपूर्वी चंपासिंह थापाची मोठी भूमिका, म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Devendra Fadnavis Profile : बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री...  घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
Ind Vs Aus 2nd Test : कॅप्टन रोहितचा प्लॅन समोर दिसताच ऑस्ट्रेलियाकडूनही मोठा फेरबदल! दोन तेजतर्रार गोलंदाजाची एन्ट्री
कॅप्टन रोहितचा प्लॅन समोर दिसताच ऑस्ट्रेलियाकडूनही मोठा फेरबदल! दोन तेजतर्रार गोलंदाजांची एन्ट्री
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Eknath Shinde DCM: उदय सामंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट, एकनाथ शिंदें म्हणाले होते, 'उपमुख्यमंत्रीपद नको, मी संघटना वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन'
एकनाथ शिंदेंच्या मनात दुसरंच होतं, शपथविधीपूर्वी उदय सामंतांचं मोठं विधान
Embed widget