(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP Crisis : शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी कशी असू शकते? मनु सिंघवींचा सवाल, तर सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्ष पदाची नियुक्तीच चुकीची, अजित पवार गटाचा पलटवार
NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीकडून पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु असून यावर सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु झाली. याबाबत निवडणूक आयोगात (Election Comission) सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या देखील निवडणूक आयोगात उपस्थित आहेत. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून वकिल मुकुल रोहोतागी हे युक्तिवाद करत आहेत तर शरद पवार गटाकडून वकिल देवदत्त कामत (Devdatta Kamat) आणि अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhavi) हे युक्तिवाद करतायत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला. तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला.
सोमवारच्या सुनावणीत काय झालं?
शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली.
अभिषेक मनु सिंघवी -
राज्यस्तरावरील 28 पैकी 20 पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.
नॅशनल वर्किंग कमीटी मधील 86 पैकी 70 सदस्य हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.
आम्ही आयोगात सादर केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र खरे आहे.
समोरच्या गटाकडून जसे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले तसे आम्ही केले नाही.
हवं तर तुम्ही तपासून पाहू शकता.
जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर शंका उपस्थित केली, ते अवैध्य आहे असं म्हणाले
पण तुम्ही लढवलेल्या निवडणुकीसाठी जयंत पाटील यांनी दिलेले AB Form वापरले
शरद पवार सोडुन राष्ट्रवादी होऊ शकत नाही
अनेक वेळा मुख्यमंत्री, आमदार,खासदार, केंद्रीय मंत्री ते राहीले आहेत. त्यांनीच या पक्षाची स्थापना केली.
त्यांनीच पक्ष वाढवला त्यामुळं शरद पावर सोडुन राष्ट्रवादी कशी होऊ शकते ?
शरद पवार यांच्या गटाचा युक्तिवाद संपला
अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहोतगी यांचा युक्तिवाद सुरु
मुकुल रोहीतगी, अजित पवार गट वकील
सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी झालेली निवड ही घटनेच्या विरोधी
एका afidivit देणाऱ्याचा मृत्यू झाला म्हणून मेरिट कमी होत का ?
रोहितगी यांचा सवाल
त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला म्हणजे मेरिट कमी झालं का ?
रोहितगी यांचा सवाल
शरद पवार यांच्या वतीने देखील खोटे शपथ पत्र दाखल करण्यात आले आहे
खोटे अफेडेव्हिटचे सॅम्पल रोहतगी यांच्याकडून निवडणूक आयोगाला दाखवत आहेत
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी 30 जून रोजीच अजित पवार यांना समर्थन दिले आहे
19 ऑक्टोबर ला चंद्रिकापुरे यांना जबरदस्ती afidivit द्यायला सांगितले