Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut : राज्यात दिवसाढवळ्या खून, अपहरण, खंडणीचे गुन्हे करणाऱ्यांना सरंक्षण दिले जात आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय.
मुंबई : पुष्पा 2 (Pushpa 2) चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun) अटक केली होती. या प्रकरणावरून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांचे कौतुक केले. या बातमीचा संदर्भ देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस सरकारवर (Fadnavis Government) निशाणा साधलाय.
संजय राऊत यांनी 'एक्स'वर पवन कल्याण यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात पवन कल्याण यांनी म्हटले आहे की, रेवंथ रेड्डी हे मातीशी जोडलेले नेते आहेत. ते एक जबाबदार आणि नेहमी माहिती ठेवणारे नेते आहे. अल्लू अर्जुनप्रकरणी त्यांनी कायदेशीर कारवाई केली. अल्लू अर्जुनच्या ऐवजी मी असतो तर मला देखील त्यांनी अटक केली असती, असे त्यांनी म्हटले आहे.
आणि आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 1, 2025
एका हत्येस अप्रत्यक्ष जबाबदार ठरल्याने अल्लू अर्जुन या सुपरस्टार ला अटक झाली.
इकडे दिवसाढवळ्या खून अपहरण खंडणी चे गुन्हे करणाऱ्याना सरंक्षण दिले जात आहे.
हैद्राबाद येथे भाजपा चे राज्य नाही!@Dev_Fadnavis @anjali_damania https://t.co/7WtZnXWqm3
हैद्राबाद येथे भाजपाचे राज्य नाही : संजय राऊत
या बातमीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, आणि आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय? एका हत्येस अप्रत्यक्ष जबाबदार ठरल्याने अल्लू अर्जुन या सुपरस्टारला अटक झाली. इकडे दिवसाढवळ्या खून, अपहरण, खंडणीचे गुन्हे करणाऱ्यांना सरंक्षण दिले जात आहे. हैद्राबाद येथे भाजपाचे राज्य नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला टोला लगावला.
व्वा! क्या सीन है??
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 30, 2024
नक्की कोण कुणाचा आका?
@Dev_Fadnavis
@anjali_damania
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde pic.twitter.com/a4jw2kWT6V
नक्की कोण कुणाचा आका?
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी 'एक्स' एक फोटो शेअर केला होता. त्यात वाल्मिक कराडसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री असणारा फोटो आहे. तो फोटो पोस्ट करुन संजय राऊत यांनी व्वा! क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका?, असा प्रश्न उपस्थित केला होता.
आणखी वाचा
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?