(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar Weather : नंदूरबारमध्ये गारठा वाढला, सातपुड्यात तापमानाचा पारा 9 अंशावर; तर तोरणमाळ परिसरात धुक्याची चादर
Nandurbar Weather : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये (Satpura Mountain Range) तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच खाली आला आहे.
Nandurbar Weather News : राज्याच्या काही भागात थंडीची लाट (Cold Wave) आली आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये (Satpura Mountain Range) तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच खाली आला आहे. तिथे तापमानाचा पारा 8.5 ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे. तर तोरणमाळ परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. थंडी वाढल्याचा परिणाम मानवी जनजीवनावर होत आहे.
पर्यटकांनी गजबजलेला यशवंत तलाव परिसर रिकामा
नंदूरबार जिल्हा चांगलाच गारठला आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं हुडहुडी वाढली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत या परिसरात कडाक्याची थंडी राहत असल्यानं नागरिक थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेत असल्याचं चित्र ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये दाट धुके पाहण्यास मिळत असून तोरणमाळ येथील सातपायरी घाट, सिताखाई, यशवंत तलाव परिसरात दाट धुके पाहण्यास मिळत आहे. तर थंडीचा कडाका वाढल्यानं नेहमी पर्यटकांनी गजबजलेला यशवंत तलाव परिसर सूनासूना असल्याचे चित्र आहे.
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही थंडी वाढली
उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दुसरीकडं मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे. तसेच मुंबईचे किमान तापमान 15 अंशाच्या आसपास खाली गेले आहे. त्यामुळं मुंबईतही थंडी वाढली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही गारठा वाढल्याचे चित्र पाहाला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 15 ते 20 अंशाच्या आसपास खाली आला आहे. त्यामुळं थंडीचा कडाका वाढला आहे.
उत्तर भारतातही गारठा वाढला
राज्यात गारठा वाढला असतानाच देशातील अनेक भागात तापमानाचा (Temperature) पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच अनेक ठिकाणी दाट धुके पडले आहे. वायव्य भारत आणि मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 2 ते 6 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: