एक्स्प्लोर
Vande Mataram Row: 'वंदे मातरम न म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे', Pravin Darekar यांचा अबू आझमींना इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अबू आझमी (Abu Azmi) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या वक्तव्यांमुळे 'वंदे मातरम' (Vande Mataram) वरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. 'आपल्या देशात राहून वंदे मातरम बोलणार नाही अशांची थोबाडं फोडली पाहिजेत', अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी अबू आझमींवर हल्लाबोल केला. सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात PM Modi यांनी काँग्रेसवर घणाघात केला. 'धार्मिक आधारावर Congress ने वंदे मातरमचा एक भाग हटवून इंग्रजांची 'फोडा आणि राज्य करा' ही नीती पुढे नेली', असा आरोप मोदींनी केला. दुसरीकडे, 'शरीयतनुसार अल्लाहशिवाय दुसऱ्या कुणाचीही वंदना इस्लाममध्ये जायज नाही, त्यामुळे मुस्लिम वंदे मातरम म्हणणार नाहीत', असे अबू आझमी (Abu Azmi) यांनी म्हटले आहे. याच वक्तव्यावर प्रवीण दरेकरांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















