(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole : भाजप नेते गावगुंडाची तुलना पंतप्रधान मोदींशी करत आहेत, नाना पटोलेंचा आरोप
Nana Patole : विरोधकांकडून मला खलनायक करण्याचं काम सुरु आहे. माझ्यामागे कोणी नाही मी सामान्य कुटुंबातून आलो म्हणून मला टार्गेट करत आहेत, असा आरोप देखील नाना पटोलेंनी या वेळी केला.
मुंबई : मोदी नावाचा गावगुंड आहे. भाजपच्या नेते गावगुंडाची तुलना मोदींशी करत आहेत, भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अवमान केला नाही. भाजप नेत्यांनी वाद ओढावून घेतल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत नाना पटोले बोलत होते.
पटोले म्हणाले, लोकप्रतिनिधींशी मी गावगुंडावर चर्चा केली. भाजपने मोदींची तुलना गावगुंडाशी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही चौकशी केली आहे. भाजपच्या नेत्यांच संतुलन बिघडले आहे. 'त्या' गावगुंडाने यावर स्पष्टीकरण दिलं, तरीही भाजप नेते आक्षेप घेतात. आमच्या पक्षात गोंधळ नाही, जे गोंधळी आहेत ते रस्त्यावर दिसत आहेत. माझ्या वक्तव्यातील मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी नव्हे. मी पंतप्रधानपदाचा अपमान होणार नाही याची काळजी घेणार आहे.
विरोधकांकडून मला खलनायक करण्याचं काम सुरु आहे. माझ्यामागे कोण नाही मी सामान्य कुटुंबातून आलो म्हणून मला टार्गेट करत आहेत. शेतकऱ्यांवर गाड्या चालवणाऱ्यांचे पुतळे का नाही जाळले?, असा सवाल देखील पटोलेंनी भाजपला केला आहे.
यापूर्वी काय म्हणाले होते नाना पटोले?
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं वक्तव्य केलं होतं. एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ रात्रीच्या वेळीचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान नाना पटोले यांच्याभोवती लोकांचा गराडा आहे. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.' नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. तर नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Nana Patole : अखेर मोदी नावाचा 'गावगुंड' पोलिसांना गवसला, मात्र त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा नसल्याचं स्पष्ट
Nana Patole Controvercy : "ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं", नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा वादंग, भाजप आक्रमक
Nana Patole : माझ्याकडून चूक झाली असेल तर पोलिसांनी कारवाई करावी : नाना पटोले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha