(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार होण्याची शक्यता; शिक्षणमंत्र्यांचे संकेत
Maharashtra School News Updates : ओमायक्रॉनच्या संकटामुळं आता एक डिसेंबरपासून सुरु झालेल्या शाळांवर पुन्हा एकदा गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Maharashtra School News Updates : राज्यात वाढत्या ओमायक्रॉन (Omicron) संकटाच्या पार्श्वभूमीवर काही नियम कठोर करण्यात आले आहेत. कोरोनामुळं गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा नुकत्याच काही भागात सुरु केल्या गेल्या. मात्र ओमायक्रॉनच्या संकटामुळं आता एक डिसेंबरपासून सुरु झालेल्या शाळांवर पुन्हा एकदा गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने पुन्हा शाळा बंद होण्यासंदर्भात संकेत दिले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन शाळांबाबत 4 ते 5 दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागालाही लहान मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे. लहान मुलांचं लसीकरण सुरू व्हावं अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर निरीक्षण करून घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. इथुन पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र, लहान मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण सुरु व्हावं अशी आमची अपेक्षा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, शाळांबाबत अजुनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वाट पाहावी लागेल. आपण तिसऱ्या लाटेला थोपवू असंही त्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
- Omicron Corona Variant : 5 राज्य, 21 रुग्ण; लसवंतांनाही संसर्ग, देशात वाढतोय ओमायक्रॉन, काळजी घ्या
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 8 हजारांहून अधिक कोरोनाबाधित, तर 21 ओमायक्रॉनचे रुग्ण
- दोन्ही डोस घेऊनही ओमायक्रॉन, मग आता बुस्टर डोस घ्यावा की, नाही? अजित पवारांचा केंद्राला सवाल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI